घरमहाराष्ट्र"तुमचं विमान वेळेवर टेक ऑफ झालं नसतं तर...", एकनाथ खडसेंनी मानले मुख्यमंत्री...

“तुमचं विमान वेळेवर टेक ऑफ झालं नसतं तर…”, एकनाथ खडसेंनी मानले मुख्यमंत्री शिंदेंचे आभार

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना काही दिवसांपूर्वी ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एअर अॅम्बुलन्सची व्यवस्था करत त्यांना मदत केली होती. यासाठी आता खडसेंनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

मुंबई : सहा दिवसांपूर्वी म्हणजेच रविवारी 5 नोव्हेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार, नेते एकनाथ खडसे यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता. यानंतर त्यांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण याबाबतची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळताच त्यांनी तत्काळ एअर अॅम्बुलन्सची व्यवस्था करत खडसे यांना उपचारासाठी जळगावहून मुंबईला घेऊन येण्याचे आदेश दिले. ज्यानंतर त्यांना तत्काळ मुंबईला आणण्यात आले आणि त्यांच्यावर उपचार करण्यात आले. यानंतर आता खडसे यांच्या प्रकृतीमध्ये बरीचशी सुधारणा झाली असून त्यांनी लगेच मुख्यमंत्र्यांनी केलेल्या मदतीसाठी त्यांचे आभार मानण्यासाठी फोनवरून संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी त्यांनी “तुमचे विमान वेळेवर टेक ऑफ झाले नसते तर माझ्या आयुष्याच विमान लँड झाले नसते,” अशी भावना व्यक्त करत आभार मानले आहेत. (Eknath Khadse thanked Chief Minister Eknath Shinde)

हेही वाचा – “ही नवीन परंपरा सुरू…”, अमित शहा-अजित पवार भेटीवर संजय राऊतांचा मिश्किल टोला

- Advertisement -

या संवादाची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यावेळी एकनाथ खडसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोलताना म्हणाले की, “आपण वेळेवर मदतीला धावून आला. एअर ॲम्बुलन्स पाठवल्याबद्दल मनःपूर्वक आभार, आपले विमान जर वेळेवर आला नसते तर आमच्या आयुष्याचे विमान लँड झाले नसते.” यावेळी मुख्यमंत्र्यांनी खडस यांच्या प्रकृतीची विचारपूस करत त्यांना त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले. तसेच त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. ज्यावेळी एकनाथ खडसे यांना ह्रदयविकाराचा झटका आला त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरे या गावी होते. एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्र्यांशी त्यावेळी संपर्क साधला होता. ज्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही तत्काळ एअर एम्ब्युलन्सची व्यवस्था करत खडसे यांना उपचारासाठी जळगावहून मुंबईला दाखल करण्यासाठी मदत केली होती.

एकनाथ खडसे यांच्यावर मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया करण्यात आली. खडसे यांच्या ह्रदयात तीन ब्लॉकेज सापडले. ज्यानंतर डॉक्टरांनी त्यावर शस्त्रक्रिया केली. परंतु, यावेळी त्यांना अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियेदरम्यान देखील ह्रदयविकाराचा झटका आला होता. यानंतर डॉक्टरांनी तत्काळ उपचार करत एकनाथ खडसे यांचे बंद पडलेले हृदय शॉक ट्रीटमेंट देऊन पुन्हा सुरू केले, अशी माहिती स्वतः खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. दरम्यान आता खडसे यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली आहे. याबाबतची माहिती त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. “मला हृदयविकाराचा त्रास झाला. आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे माझी तब्येत आता चांगली आहे. लवकरच मी पूर्णपणे बरा होऊन आपल्या सेवेत रुजू होईल. प्रसंग कोणताही असो, आपण माझ्या पाठीशी उभे राहतात. आपले हेच सदिच्छांचे पाठबळ मला अधिक जोमाने काम करण्यासाठी बळ देते. आपणा सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद” अशी पोस्ट एकनाथ खडसे यांच्याकडून करण्यात आली आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -