राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना विधानपरिषेची उमेदवारी (maharashtra legislative council election) दिली आहे. भाजपातून (bjp) राष्ट्रवादीत आलेल्या खडसे यांचे पुर्नवसन आता होणार आहे. उमेदवारी दिल्याबद्दल खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांचे आभार मानले आहे. ट्टिवट करत खडसे यांनी आता राष्ट्रवादी वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
खडसे यांनी ट्टिवटमध्ये म्हटले की, ज्या निष्ठेने गेल्या ४० वर्षात काम केले त्याहून अधिक ताकदीने आता पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करणार. मला विधानपरिषदेसाठी उमेदवारी दिल्याबद्दल पक्षाध्यक्ष पवार साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा, प्रदेशाध्यक्ष जयंतराव व सर्व नेत्यांचे विनम्र आभार.
भाजपमध्ये (bjp) ४० वर्षे राहिलेल्या एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी गेल्या वर्षी राष्ट्रवादीमध्ये (NCP) प्रवेश केला. भाजपमध्ये अडगळीत पडलेल्या खडसे यांनी राष्ट्रवादीची वाट धरल्यानंतर त्यांचे पुनर्वसन कधी होणार याकडे लक्ष लागले होते. आता राष्ट्रवादीने त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे. गुरूवारी खडसे यांनी उमेदवारी अर्ज भरला. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना खडसे म्हणाले की, एकनाथ खडसे आता संपले. ते आता विधिमंडळात परत पाय ठेवत नाहीत, अशी चर्चा काही दिवसांपूर्वी लोक करत होते. मात्र, मात्र, शरद पवार (sharad pawar) आणि अजित पवार यांनी विधानपरिषदेची उमेदवारी देऊन माझ्यावर विश्वास दाखवला आहे. यासाठी मी त्यांचे ऋणी आहे. मला अडगळीत टाकण्यात आले होते. यावेळी अडचणीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसने मला साथ दिली. त्यामुळे आता राष्ट्रवादीशी प्राामाणिक राहणे ही माझी भूमिका असेल.
ज्या निष्ठेने गेल्या ४० वर्षात काम केले त्याहून अधिक ताकदीने आता @NCPspeaks पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करणार.
मला विधानपरिषदेसाठी उमेदवारी दिल्याबद्दल पक्षाध्यक्ष आदरणीय पवार साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा, प्रदेशाध्यक्ष जयंतराव व सर्व नेत्यांचे विनम्र आभार.— Eknath Khadse (@EknathGKhadse) June 9, 2022
दरम्यान, भाजपने पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी नाकारल्याने एकनाथ खडसे यांनी दुख: व्यक्त केले आहे. पंकजा ताईंचे मुंडे कुटुंबीयांचे आणि आमचे फार अत्यंत जवळचे संबंध आहेत. या निर्णयामुळे माझ्या मनाला वेदना झाल्या, असे खडसे म्हणाले. खडसे म्हणाले की, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पक्षामध्ये आणणं, त्यांना संधी देणं हे त्यांनी केलेलं आहे. अशा स्थितीत पंकजा ताई या कर्तृत्ववान महिला आहेत. राजकारणात त्यांची पूर्ण महाराष्ट्रात ओळख आणि अस्तित्व आहे. अशा ठिकाणी पंकजा ताईंची उमेदवारी नाकारली हे अत्यंत दुर्दैवी आहे. मला अत्यंत खेद झाला. या ठिकाणी जो निर्णय जरी बीजेपीचा असला तरी पंकजा ताईंचे मुंडे कुटुंबीयांचे आमचे फार अत्यंत जवळचे संबंध आहेत. या निर्णयामुळे माझ्या मनाला वेदना झाल्या आहेत.