घरताज्या घडामोडीफडणवीस, महाजनांवर थेट आरोप केल्यानंतर भाजपकडून खडसेंची मनधरणी

फडणवीस, महाजनांवर थेट आरोप केल्यानंतर भाजपकडून खडसेंची मनधरणी

Subscribe

गेल्या काही महिन्यांपासून नाराज असलेले भाजप नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपला नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. त्याची गंभीर दखल भाजपने घेतली असून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु केल्याची माहिती गुरुवारी भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी दिले. तर ते लवकरच राज्याच्या किंवा दिल्लीच्या सक्रीय राजकारणात दिसतील, असे सूतेवाच देखील त्यांनी यावेळी दिलेत.

विधानसभा निवडणुकीच्या काळात आपले तिकीट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीष महाजन यांनी कापले असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी नुकताच केला होता. या आरोपानंतर भाजपसह राजकीय वतुर्ळात पुन्हा एकदा नव्या चर्चेला उधाण आले आहे. त्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून देखील यांची गंभीर दखल घेण्यात आल्याचे दिसून आले. याप्रकरणी गुरुवारी भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी खडसे यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आल्याची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली.

- Advertisement -

हे वाचा – पहिल्यांदाच खडसेंचा देवेंद्र फडणवीसांवर थेट निशाणा!

याबद्दल बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, एकनाथ खडसे यांच्याबरोबर आम्ही चर्चा करणार आहोत. त्याबाबत मी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत. मी स्वत चंद्रकांत दादांशी बोललो असून पक्षात कोणाची ही नाराजी असल्यास ती संवादातून दूर व्हायला हवी, असे सांगितले आहे. तर खडसे हे भाजपाचे ज्येष्ठ नेते असून गेली ४० वर्षांपासून त्यांनी पक्ष विस्तारासाठी काम केले आहे. त्यामुळे यासंदर्भात आपण चंद्रकांत पाटील यांच्याशी देखील चर्चा केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तर खडसे कुठेही जाणार नाहीत, ते भाजपवासी असल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -