घरताज्या घडामोडीBHR घोटाळ्याप्रकरणी खडसेंनी गिरीश महाजन यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान

BHR घोटाळ्याप्रकरणी खडसेंनी गिरीश महाजन यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान

Subscribe

हे तर हीमनगाचं छोटंस टोक आहे, दोन महिन्यात बड्या नेत्यांची नावं समोर येतील.

जळगावमधील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटी अर्थात ‘बीएचआर’ गैरव्यवहार प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेत गिरीश महाजनांसंदर्भात मोठे विधान केले आहे. सुनील झंवर यांच्याकडे गिरीश महाजनांचे लेटर हेड सापडले म्हणजे तो त्याच्यामध्ये सहभागी आहे, असे म्हणणे म्हणजे सुतावरुन स्वर्ग गाठण्यासारखे आहे. पोलीस चौकशी करत आहेत. गिरीश महाजानांचे लेटर पॅड तिथे कसे आले याची सर्व माहिती पोलिसांकडे पोहोचली आहे. हे केवळ हिमनगाचे टोक आहे, दोन-तीन महिन्यात अजून बरिच माहिती समोर येणार आहे, असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला.

Adv. कीर्ती पाटील यांनी सन २०११ पासून याबाबत राज्य व केंद्र शासनाकडे तक्रारी केल्या आहेत. आतापर्यंत १६ तक्रारी केल्या असल्याचेही खडसे यांनी सांगीतले. यात मोठ्या मंडळींची देखील नावे बाहेर येणार आहेत. मला खात्री आहे. माझ्याकडे त्याबाबतची कच्चे कागदपत्र आहेत. पक्के कागद मी पोलिसांना दिले आहेत, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.

- Advertisement -

बेनामी मालमत्तेच्या ठेवींप्रकरणी चौकशीच्या रडारवर असलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटी अर्थात ‘बीएचआर’शी निगडित जळगावात पाच ठिकाणी पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले. आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या पथकाकडून करून सुरू करण्यात आलेली तपासणी आज तिसऱ्या दिवशी देखील सुरू होती. या प्रकरणी उद्योजक माजी मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय सुनील झंवर यांच्या गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, जळगाव शहरातील बीएचआर पतसंस्था व संशयितांच्या निवासस्थानातून तसेच कार्यालयांमधून आर्थिक गुन्हेशाखेच्या पथकांनी जप्त केलेले दस्ताऐवज, संगणक, हार्डडिस्क यासह विविध प्रकारच्या फाईली असा सुमारे ट्रकभर सामान पुण्याकडे तपासासाठी रवाना करण्यात आलेले आहे.


हेही वाचा – BHR घोटाळ्याचे धागेदोरे गिरीश महाजनांपर्यंत? खडसे पत्रकार परिषदेत कोणता बॉम्ब फोडणार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -