ती सीडी पोलिसांकडे, योग्य वेळी लावणार – खडसेंचा इशारा

चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या शेजारी बसणाऱ्या लोकांची चौकशी करावी - एकनाथ खडसे

Eknath Khadse slams bjp and mns and appeal citizen what is going on in the state for the sake of entertainment

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजप सोडल्यावर माझ्यामागे ईडी लावल्यास मी सीडी लावेन असे वक्तव्य केलं होते. खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यावर त्यांच्याविरोधात भोसरी भूखंड प्रकरणी ईडीची कारवाई सुरु झाली आहे. या कारवाईवरुन खडसे सीडी कधी लावणार अशी विचारणा राजकीय वर्तुळात करण्यात येत होती. यावर खडसेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ती सीडी पोलिसांकडे असून योग्य वेळी लावणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माझी चौकशी त्यांनी लावली असल्याचे कबुल केल्यामुळे मी त्यांचा आभारी आहे मात्र शेजारी बसलेल्यांचीही चौकशी लावा असे एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

रष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये योग्य वेळी ईडीच्या कारवाईला सीडी लावणार असल्याचे म्हटलं आहे. पोलिस त्या सीडीवर तपास करत आहेत. त्या तपासाचा अहवाल आल्यावर सीडी लावेल अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे. “मला ईडी लावली तर मी सीडी लावेन हे मी बोललो आहे. आणि योग्य वेळी त्या संदर्भात येईल. सीडीची चौकशी पोलिसांकडून गेल्या ६ महिन्यांपासून सुरु आहे. त्यांचा रिपोर्ट आल्यावर अहवाल जाहीर करेल. गेल्या ४० वर्ष राजकीय जीवनात काम करत आहे. मागील ४० वर्षात एकही आक्षेप माझ्यावर आला नाही. या जमीनीच्या संदर्भात आक्षेप हेतूपरस्पर घेण्यात आला आहे. या व्यवहाराची पुर्ण चौकशी झाली आहे. या चौकशीचा सी समरी पुण्याच्या कोर्टात गेली आहे. त्याच्यात कोणतेही तथ्य नाही असे एसीबीने दिले आहे”, असे एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

एसीबीच्या कारवाईनंतरही ईडीची चौकशी सुरु आहे. कर नाही तर त्याला डर कशाला या माध्यमातून मी ईडीच्या चौकशीला समोरे जात आहे. वारंवार या सरकारला सांगत आहे की, माझा काय दोष आहे. ते सांगा ? माझे विधानसभेतील भाषणे आजही युट्यूबर आहेत. माझा दोष असेल तर फाशीवर लावा असे सभागृहातही सांगितलं आहे. आणखी ईडीने चौकशी लावली काही चूक असेल तर कारवाई होईल. न्यायालयात जे काय व्हायचे ते होईल असे एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटील यांचा आभारी

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा मी आभारी आहे. त्यांनी मान्य केलंय की, माझी ईडीची चौकशी त्यांनी लावली आहे. जे भ्रष्टाचार करतात त्यांच्यावर आम्ही कारवाई करतो असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. यामुळे मला अपेक्षा आहे की, दादांनी त्यांच्या शेजारी बसणाऱ्या लोकांची चौकशी करावी अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे.


हेही वाचा :  परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस – खासदार राऊतांनी दिली माहिती