घरमहाराष्ट्रएकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस घाईघाईने दिल्लीला रवाना; राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना वेग

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस घाईघाईने दिल्लीला रवाना; राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना वेग

Subscribe

राज्याचा रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार आणि पालकमंत्रीपदाचा अद्याप न सुटलेला पेच यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिंदे-फडणवीसांवर मोठा दबाव असल्याची चर्चा आहे. त्याचमुळे आता हे दोन्ही नेते दिल्लीला गेलेत की काय अशी चर्चा आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू असतानाच आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते गैरहजर राहिले. त्यामुळे अजित पवार यांच्या नाराजीच्या चर्चांना आणखी उधाणं आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अजित पवार गैरहरज असल्याबाबत प्रतिक्रिया दिली. अजित पवार यांची तब्येत बरी नसल्यानं ते बैठकीला येऊ शकले नाहीत, असं शिंदे म्हणाले. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घाईघाईने दिल्लीला गेल्यानं आता राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे. (Eknath Shinde and Devendra Fadnavis rush to Delhi Arguments speed up in political circles)

मागच्या काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा आहे. आजच्या राज्याच्या मंत्रिमडळाच्या बैठकीलाही ते उपस्थित नव्हते. राज्याचा रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार आणि पालकमंत्रीपदाचा अद्याप न सुटलेला पेच यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिंदे-फडणवीसांवर मोठा दबाव असल्याची चर्चा आहे. त्याचमुळे आता हे दोन्ही नेते दिल्लीला गेलेत की काय अशी चर्चा आहे. कारण राज्य मंत्रिमडळात विस्तार करण्यासाठी केंद्रीय नेतृत्त्वाशी चर्चा करणं गरजेचं आहे.

- Advertisement -

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या एका कार्यक्रमाला होते यावेळी त्यांनी वेळेआधीच समारोपाचं भाषण केलं आणि ते ताबडतोब दिल्लीला रवाना झाले.

शिंदे गटात अस्वस्थता

अजित पवार सत्तेत सहभागी झाले तेव्हाच शिंदे गटात धुसफूस सुरू झाली होती. अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानं मंत्रिमंडळ विस्तारात आणखी एक वाटेकरी निर्माण झाला. त्यामुळे अजित पवार यांच्या गटाच्या नेत्यांसाठी देखील मंत्रिपदं देण्यात आली. यावेळी शिंदे आणि भाजपकडील काही महत्त्वाची खाती अजित पवार गटाला मिळाली. अजित पवार यांना स्वत:ला अर्थ खातं मिळालं. याशिवाय त्यांच्या गटाला शिंदे गटाकडे असणारं कृषी खातंदेखील मिळालं. यावरून बरीच चर्चा सुरू होती. विशेष म्हणजे त्यावेळी शिंदे गटाच्या नेत्यांनी जाहीरपणे अजित पवर यांच्या सत्तेत सहभागी होण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.

- Advertisement -

(हेही वाचा: टेंभू पाणी योजना : फडणवीसांच्या आश्वासनानंतर सुमन पाटील, रोहित पाटील यांचे उपोषण मागे )

पटेल, तटकरे देवगिरीवर

दरम्यान, अजित पवारांच्या नाराजीची चर्चा असताना राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्यासह अजित पवार गटाच्या आमदारांनी आज देवगिरीवर जाऊन अजित पवार यांची भेट घेऊन चर्चा केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -