एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, फडणवीसांचा धक्का

Eknath Shinde's new tweet after his name for the post of Chief Minister was announced

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री आहेत, अशी घोषणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. आज साडेसात वाजता शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांचा एकट्याचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. तसेच लवकरच पुढील कारवाई करून मंत्रिमंडळ विस्तार करणार आहोत. महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडा, असे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना सांगत होते, पण उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचे ऐकले नाही. बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्यांच्याशी संघर्ष केला अशा लोकांना घेऊन सरकार स्थापन केले. या अडीच वर्षाच्या काळात प्रगती झाली नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मविआसोबत जाण्याच्या एका निर्णयामुळे महाविकास आघाडी सरकारवर शिवसेनेचे अनेक नेते उद्धव ठाकरेंवर नाराज होते. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी बंडखोरी करत बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत रहायला आम्ही तयार नाही. उद्धवजींनी आमदारांऐवजी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्राधान्य दिलं त्यांची कास धरुन ठेवली. आज हे सरकार गेलं. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्राला पर्यायी सरकार देणार आहोत. आधी विचारलं जायचं तेव्हा सांगितलेलं की पर्यायी सरकार देऊ निवडणुका लागणार नाही, असं फडणवीस म्हणाले.


हेही वाचा : महाराष्ट्राचे रिमोट कंट्रोल देवेंद्र फडणवीसांच्या हाती