हे सरकार सूडबुद्धीने काम करणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन

विधीमंडळ अधिवेशनाचा आज दुसरा दिवस सुरू आहे. विधानसभा सभागृहात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार बॅटींग केली आहे. हे सरकार सूडबुद्धीने काम करणार नाही, अशा प्रकारचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.

हे सरकार सूडबुद्धीने काम करणार नाही

कितीही शक्ती आणि ताकद असल्यातरी आमचं सरकार स्थिर आहे. आमचं १७० चं संख्याबळ असलं तरी आणखी वाढत राहील. जरी वाढलं तरीसुद्धा आपण एक लक्षात ठेवा की, हे सरकार सूडबुद्धीने काम करणार नाही, आकस बुद्धीने काम करणार नाही. तुम्ही घेतलेले निर्णय आम्ही सरसकट बदलणार नाही. ज्यामध्ये चुकीचं काही आहे. तसेच अनावश्यक काही गोष्टी घडल्या असतील. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी ते बोलून काही गोष्टी सोडवू. कुठल्याही पद्धतीने आमच्या डोक्यात ‘ग’ची भाषा येणार नाही. आम्ही जे कार्यकर्ते आहोत. ते कार्यकर्तेच राहणार आहोत, असं शिंदे म्हणाले.

सर्व प्रकल्प आपण मार्गी लावू

सर्व राज्यातील लोकांना न्याय देण्याचं सरकार, सर्वांगिण विकास करणार सरकार तसेच जे काही मेट्रो प्रकल्प असतील. समृद्धी हायवे असतील. पुणे रिंग रोड, मुंबई-गोवा हायवे हे सर्व जे काही प्रकल्प आहेत. ते सर्व प्रकल्प आपण मार्गी लावू आणि राज्याला प्रगतीपथावर घेऊन जाऊ. केंद्राची मदत घेऊन राज्याचं सुजलाम सुफलाम करू. मला वाटतं सर्वांनी मिळून आपण हे सर्व स्वीकारलं पाहीजे. शेवटी लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व असतं. बहुमत आपण कालही आणि आजही बघितलं. काल देखील यामध्ये भर पडली. त्यामुळे तुम्ही हे स्वीकारलं पाहीजे की, हे बहुमताचं सरकार आहे. त्यामुळे आमच्याकडून चुकीचं कधीही-काहीही होणार नाही. एवढी आपल्याला मी खात्री देतो, असं शिंदे म्हणाले.

हिरकणी गाव वाचवण्याकरीता शासनाच्या माध्यमातून २१ कोटींचा निधी

रायगड किल्ला ही आमची अस्मिता आहे. ज्या हिरकणीने इतिहास घडवला. ते हिरकणी गाव वाचवण्याकरीता शासनाच्या माध्यमातून २१ कोटींचा निधी एकनाथ शिंदेंनी जाहीर केला आहे. जागतिक बाजारात तेलाच्या किंमती वाढल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय कर कमी केला होता. तसेच राज्यानेही व्हॅट कमी केला होता. परंतु महाराष्ट्राने काहीही कर कमी केला नव्हता. त्यामुळे हे युतीचं सरकार लवकरात लवकर कर कमी करण्याचा निर्णय घेत असून सर्व सामान्यांना मोठा दिला मिळणार आहे, असं शिंदे म्हणाले.


हेही वाचा : मी कधीही पदासाठी लालसा केली नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे