Tuesday, September 28, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी चिपळूण शहर पुर्ववत करण्यासाठी ५ अधिकाऱ्यांची नियुक्ती, स्वच्छतेसाठी २ कोटींची घोषणा -...

चिपळूण शहर पुर्ववत करण्यासाठी ५ अधिकाऱ्यांची नियुक्ती, स्वच्छतेसाठी २ कोटींची घोषणा – एकनाथ शिंदे

पाणी ओसरल्यानंतर आता शहरात सामान खराब झाल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे.

Related Story

- Advertisement -

चिपळूमध्ये मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. पुराचे पाणी ओसरले असून आता चिपळूण शहरामध्ये चिखलच चिखल झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे नागरिकांसमोर आता चिखल साफ करण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. घरांत, दुकानांत आणि रस्त्यांवर चिखल झाला आहे. यामुळे चिपळूणमधील स्वच्छतेसाठी २ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. तर पुन्हा चिपळूण शहर उभं करण्यासाठी २ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आली असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करुन आढावा घेतला आहे.

चिपळूण शहरात पुराच्या पाण्याखाली होते यामुळे शहरासह नागरिकांचे प्रचंड नुकसान झालं आहे. शहरातील अनेक भागात तब्बल २० फुटापर्यंत पाणी होते यामुळे घरांमध्ये शहरात चिखल झाला आहे. पाणी ओसरल्यानंतर आता शहरात सामान खराब झाल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे. तातडीने शहर स्वच्छ करण्यासाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर स्वच्छता कार्य वेगाने करण्यासाठी ५ मुख्याधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. तर ठाणे, नवी मुंबईतील स्वच्छता कर्मचारीही मदतीसाठी पाठवणार असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

- Advertisement -

चिपळूणमध्ये उद्भवणाऱ्या पूर परिस्थितीचा विचार करता कायमस्वरुपी निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. यामुळे पुढील धोका लक्षात घेऊन चिपळूणसाठी बोटी, लाईफ जॅकेट्स आणि अन्य आवश्यक साहित्य खरेदी करण्याबाबत निर्णय घेतला असून याबाबत शासनाला प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याची सुचना महाड अधिकाऱ्यांकडे केली आहे.

वाहन दुरुस्ती उपक्रम

- Advertisement -

चिपळूम शहरात आणि पूरग्रस्त भागात पाण्यामुळे अनेक वाहने वाहून गेली आहेत. तर चार चाकी आणि दुचाकी वाहने चिखलात रुतून बसले आहेत. या वाहनांचे प्रचंड नुकसान झाले असून नादुरुस्त झाली आहेत. या वाहनांना दुरुस्त करण्यासाठी शिवसेनेकडून दुचाकी विनामूल्य दुरुस्त करुन देण्याचा उपक्रम घेण्यात येणार आहे. अशी माहिती स्थानिक शिवसेना उपविभाग प्रमुख बालाजी कांबळे यांनी दिली आहे. तसेच ठाण्याहून नगरसेवक राजेश मोरे या उपक्रमात लागणारे साहित्य पाठवणार आहेत. आज दिवसभरात चिपळूणमध्ये या उपक्रमाअंतर्गत १५ दुचाकी दुरुस्त करुन दिल्या आहेत.

- Advertisement -