घरमहाराष्ट्रएकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि नवस पूर्ण झाला; शिंदे गटातील आमदार म्हणाले...

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि नवस पूर्ण झाला; शिंदे गटातील आमदार म्हणाले…

Subscribe

राज्यात शिंदे सरकार आणले आहे त्यामुळे राज्याचे प्रश्न झपाट्याने सुटू लागले आहेत

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिंदे गटातील सर्व मंत्री आणि आमदारांना घेऊन गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार आहेत. त्यांचा गुवाहाटी दौरा निश्चित झाला आहे. दरम्यान या दौऱ्यात कामाख्या देवीचे दर्शन आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांची भेट असे दोन मुख्य कार्यक्रम असणार आहेत. त्याचसोबत काही महिन्यांपूर्वीच या दौऱ्याची तयार करण्यात आली होती. ज्योतिषाला हात दाखविल्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंवर टीका होत होती. अशातच आता पुन्हा मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह शिंदे गटातील सर्व मंत्री आणि आमदार गुवाहाटीला जाण्यावरून त्यांचा हा दौरा वदाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हे दिसत आहेत.

देवीचे आभार मानण्यासाठी पुन्हा गुवाहाटीला जातोय – शहाजीबापू पाटील
यासंदर्भांत आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले की, आम्ही देवीला नवस केला होता. देवीने आता राज्यात शिंदे सरकार आणले आहे त्यामुळे राज्याचे प्रश्न झपाट्याने सुटू लागले आहेत आणि म्हणूच देवीचे आभार मानण्यासाठी आम्ही पुन्हा गुवाहाटीला जात आहोत, असे शहाजीबापू यांनी सांगितले. यावेळी त्यांनी काय झाडी काय डोंगर होणार नाही, आता काय शिंदे फडणवीस सरकार, काय त्याचा कारभार आणि काय महाराष्ट्र, सगळं एकदम ओके असणार असल्याचा डायलॉगही त्यांनी मारला.

- Advertisement -

नवस फेडण्यासाठी गुवाहाटीला जातोय – आमदार किशोर पाटील
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिंदे गटाचे मंत्री आणि आमदार गुवाहाटीला गेले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावे, असा नवस कामाख्या देवीला आम्ही केला होता. हा नवस आता पूर्ण झाला आहे त्यामुळे हा नवस फेडण्यासाठी आम्ही सर्व मंत्री आणि आमदार कामाख्या देवीचे दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी गुवाहाटीला जाणार असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले आहे.

दरम्यान तीन महिन्यापूर्वी शिवसेनेत बंडाळी करून एकनाथ शिंदे यांनी भाजपशी हातमिळवणी केली. शिवसेनेतील काही आमदारांनी त्यांना समर्थन दार्शवीला पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे आपल्या सोबत असलेल्या सर्व आमदारांना घेऊन आधी सुरतला आणि तिथून गुवाहाटी येथे मुक्कामी होते. गुवाहाटी येथे सर्वाधिक काळ त्यांचा मुक्काम होता. या काळात त्यांनी भारतातील एक प्रसिद्ध देवस्थान असलेल्या कामाख्या देवीच्या मंदिरात जाऊन तिथे विशेष पूजा केली होती आणि देवीला नवस केला होता.

- Advertisement -

हे ही वाचा – अंकशास्त्र हे शास्त्र असल्याचे सिध्द करा; अंनिसचे ‘त्या’ ईशान्येश्वर संस्थानला आवाहन

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -