घरमहाराष्ट्रशिंदे-फडणवीस सरकार 100 टक्के पडणार; संजय राऊतांचा मोठा दावा

शिंदे-फडणवीस सरकार 100 टक्के पडणार; संजय राऊतांचा मोठा दावा

Subscribe

शिंदे- भाजप सरकार पडणार, लवकरच मध्यावधी निवडणुका लागणार असल्याचे संकेत महाविकास आघाडी सककारमधील अनेक नेत्यांकडून दिले जात आहेत. यात खुद्द भाजपचे मंत्री रावसाहेब दानवे यांनीही राज्यातील स्थिती गोंधळलेली असल्याचे म्हटले. यामुळे खरचं राज्यातील शिंदे फडणवीस सरकार कोसळणार की काय यावर उलट-सुलट चर्चा रंगतायत. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील शिंदे-फडणवीस सरकार 100 टक्के कोसळणार असल्याचा मोठा दावा केला आहे. राऊत म्हणाले की, रावसाहेब दानवे कधी कधी खरंही बोलून जातात, हे मध्यावधीचे संकेत समजावेत. शिंदे फडणवीस सरकार 100 टक्के पडणार असल्याचा दावा राऊतांनी केला आहे.

दानवे नेमकं काय म्हणाले?

महाविकास आघाडीचे सरकार जाईल असे कुणालाही वाटत नव्हते, मात्र अशी जादू झाली की अडीच वर्षात सरकार कोसळले, त्यामुळे उद्या नेमकी राजकीय परिस्थिती काय असेल याचा अंदाज बांधला येत नाही, अस केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे म्हणाले.

- Advertisement -

सध्याची राजकीय परिस्थिती गोंधळलेली आहे. कधी काय होईल याचा नेम नाही. त्यामुळे जनतेची कामे करा, असा सल्लाही दानवेंनी दिला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडमधील सिरजागाव एका कार्यक्रमात रावसाहेब दानवे बोलत होते.

दानवेंच्या वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया 

यावर प्रतिक्रिया देत संजय राऊत म्हणाले की, रावसाहेब दानवे कधी कधी खरं बोलून दाखवतात. दोन महिन्यांनंतर काहीही होऊ शकतं. म्हणजे सरकार पडू शकतं म्हणजेच त्यांनी मध्यवधीचे संकेत दिले आहेत. हे सरकार 100 टक्के कोसळणार, यबाबत माझ्याकडे पूर्ण माहिती आणि खात्री आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

- Advertisement -

येत्या काही दिवसांत शिंदे फडणवीस सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसर टप्पा पार पडणार आहे. मात्र या सरकारमध्ये मोठ्याप्रमाणात नाराजी नाट्य रंगत असल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर राऊतांनी हा दावा केल्याची चर्चा आहे.

गोरेगाव पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी जामीन मिळाल्यनंतर शिवसेना खासदार संजय राऊत पहिल्यांच दिल्लीत गेले, यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांना भेट असल्याची चर्चा आहे. मात्र राऊतांनी दिल्लीत पक्षाच्या आणि इतर कामांसाठी आलो आहे. असं म्हटले आहे.


परदेशी प्रवाशांसाठी आता भारतात नियम शिथिल, Air Suvidha फॉर्म भरण्याची सक्ती रद्द, RT-PCR चीही गरज नाही

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -