घरमहाराष्ट्र'या' पाच नेत्यांनी उद्धव ठाकरेपर्यंत पोहचू दिलं नाही; शहाजी बापूंचा थेट आरोप

‘या’ पाच नेत्यांनी उद्धव ठाकरेपर्यंत पोहचू दिलं नाही; शहाजी बापूंचा थेट आरोप

Subscribe

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 41 हून अधिक आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. तर भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. राज्यात एकीकडे सत्तांतरणा होत असताना दुसरीकडे मात्र बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील आपल्या काय झाडी, काय डोंगार, काय हाटील’ या डायलॉगमुळे राज्यात प्रसिद्ध झोतात आले. याच शहाजी बापूंनी शिंदे- फडणवीस सरकार आल्यानंतर आता ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंभोवतीच्या विशिष्ट नेत्यांच्या कोंडाळ्यानं आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचू न दिल्याचा थेट आरोप शहाजी बापूंनी केला आहे. तसेच त्यांची नाव घेत शहाजी बापूंनी आरोप केले आहेत. यावेळी शहाजीबापू पाटील यांनी आक्रमक शैलीत उद्धव ठाकरेंभोवतीच्या बडव्यांचा समाचार घेतला आहे.

शहाजीबापू उद्धव ठाकरे यांच्याभोवतीच्या कोंडाळा करणाऱ्या नेत्यांबाबत म्हणाले की, पहिला नेता म्हणजे संजय राऊत, त्यानंतर अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर, विनायक राऊत आणि अरविंद सावंत. हे कोंडाळं उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत काहीच पोहचू देत नव्हते. कोणत्याही कार्यक्रमाला या नेत्यांच्या कोंडाळ्यातून उद्धव ठाकरे येत होते, तर कार्यक्रम संपल्यावर याच नेत्यांच्या कोंडाळ्यातून ते परत जात होते. यावेळी आम्ही मात्र बाजूलाच राहायचो, अशी खदखद शहाजीबापू पाटील यांनी बोलून दाखली आहे. ते बुधवारी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

- Advertisement -

यावेळी शहाजी बापूंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसोबतचा एका किस्साही सांगितला आहे. मी पराभूत उमेदवार होतो तेव्हा शरद पवारांनी मला पहाटे ५ वाजता भेटीची वेळ दिली होती. यावेळी त्यांनी माझे म्हणणे ऐकून घेतले. राजकारणात एका बाजूला व्यक्तिगत काम महत्त्वाचे असते. तर दुसऱ्या बाजूला पक्षाच्या नेत्याने ‘शाबास रे पठ्ठ्या’ म्हणत पाठीवर दिलेली शाबासकीची थाप बरेच काम करून जाते, असेही शहाजीबापू पाटील यांनी म्हटले.

यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांचे तोंड भरून कौतुक देखील केले. शहाजीबापू पाटील म्हणाले की, उद्धव ठाकरे हे मोठे नेते असले तरी एकनाथ शिंदे हेचआमचा नेता आहेत. एकनाथ शिंदे करुणामय आणि दयाळू अंत:कारणाचे नेते आहेत, अशी स्तुतीसुमने शहाजीबापू पाटील यांनी उधळली.


स्मृती इराणींकडे केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाची तर ज्योतिरादित्य सिंधियांकडे पोलाद मंत्रालयाची जबाबदारी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -