घरमहाराष्ट्रएकनाथ शिंदेंच्या संपर्कात २४ आमदार, ११ आमदार गुजरातच्या हॉटेलमध्ये

एकनाथ शिंदेंच्या संपर्कात २४ आमदार, ११ आमदार गुजरातच्या हॉटेलमध्ये

Subscribe

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे पक्ष नेतृत्त्व आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज असून ते सध्या गुजरातच्या ली मेरिडिअन हॉटेलमध्ये आहे

राज्याचे नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे दोन डझनपेक्षा जास्त आमदार त्यांच्या संपर्कात असून सध्या त्यांच्यासोबत ११ आमदार गुजरातच्या डी मेरिडिअन हॉटेलमध्ये आहे. शिंदेंसोबत असलेल्या आमदारांमध्ये मुंबई, ठाणे, रायगड आणि मराठवाड्यातील आमदारांचा समावेश आहे. शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीबद्दल प्रचंड नाराजी असून महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.

यापूर्वी शिवसेनेतून फूटून छगन भुजबळ यांच्यासोबत काँग्रेसमध्ये गेलेले १७ आमदार होते. तर नारायण राणेंसोबत काँग्रेसमध्ये जाताना १३ होते, मात्र एकनाथ शिंदेंसोबत २४ हून अधिक आमदार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजतेय. यामध्ये शिवसेनेच्या डझनभर आमदारांचे मोबाईल नॉट रिचेबल असून यापैकी काही जण शिंदेंसोबत गुजरातमध्ये असल्याची माहिती आहे.

- Advertisement -

भाजपचे केंद्रीय नेते आणि राज्यातील अनेक नेते एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असून यामुळे महाराष्ट्रात राजकीय उलथापात होण्याची शक्यता वर्तवली जातेय. दरम्यान यामुळे शिवसेनेत होणारी फाटाफूट रोखण्यासाठी आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यांचा पूर्वनियोजित दिल्ली दौरा रद्द केला आहे. तर महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांच्या देखील बैठकांना वेग आहे.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे पक्ष नेतृत्त्व आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज असून ते सध्या गुजरातच्या ली मेरिडिअन हॉटेलमध्ये आहे. त्यांच्यासोबत १२ हून अधिक आमदार असून आता शिवसेनेत फूट अटळ आहे. या घडामोडींमुळे शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिल्ली दौरा आटोपता घेऊन ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. एकनाथ शिंदे ली मेरिडिअन हॉटेलमध्ये असून त्या हॉटेलबाहेर कडक पोलीस बंदोबस्त आहे. यादरम्यान भाजपचे नेतेही एकनाथ शिंदेच्या संपर्कात आहे. हा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप असून एकनाथ शिंदे यांनी सोमवारी रात्री गुजरातमध्ये जाऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. शिवसेनेचे नाराज नेते एकनाथ शिंदे यांच्यासह १२ आमदार हे गुजरातमध्ये आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या आजच्या बैठकीला एकनाथ शिंदे उपस्थित राहणार नाहीत असे समजते.


विधान परिषद निवडणुकीत भाजपची पुन्हा बाजी, प्रसाद लाड विजयी, तर चंद्रकांत हंडोरेंचा धक्कादायक पराभव

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -