घरताज्या घडामोडी... होय मी कंत्राटी मुख्यमंत्री, एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर सडकून टीका

… होय मी कंत्राटी मुख्यमंत्री, एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर सडकून टीका

Subscribe

दसरा मेळाव्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा खरपूस समाचार घेतला आहे. एकनाथ शिंदे यांना कंत्राटी मुख्यमंत्री म्हणून हिणवणाऱ्या ठाकरेंवर त्यांनी सडकून टीका केली आहे. होय मी कंत्राटी मुख्यमंत्री, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

तुम्ही म्हणताय की मी कंत्राटी मुख्यमंत्री आहे. पण मी सांगतो होय मी कंत्राटी मुख्यमंत्री आहे. मी जनतेची सेवा करण्याचं आणि राज्याला सुजलाम सुफलाम करण्याचं कंत्राट घेतलं आहे. या राज्याचं कंत्राट योग्य कंत्राटदाराच्या हाती गेलंय. ज्या लोकांनी सेना संपवण्यासाठी काय काय केलं? हे तुम्हाला सांगायची गरज नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

कोविड काळात आम्ही पीपीई कीट घालून लोकांमध्ये गेलो. जीवाची पर्वा केली नाही. सर्वांना मदत केली. पूराच्या पाण्यातून गेलो. मीच नाही असंख्य शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी जीव धोक्यात घातला. अनेक पदाधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. तुम्ही त्याची दखल घेणार की नाही, असं असताना तुम्ही कुणाला सांभाळलं, असा प्रश्न एकनाथ शिंदेंनी उपस्थित केला.

या राज्यात मोठे उद्योग आले पाहिजेत यासाठी मला तुमचं सहकार्य पाहिजे. राज्यात मोठंमोठे प्रकल्प आणण्यासाठी केंद्र सरकार पूर्णपणे तुमच्या पाठिशी उभा आहे, असं मोदींनी मला सांगितलं आहे. तुम्ही किती इन्हवेस्ट केली, मला सांगा?, मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि मी निर्णय घेतला की, मुंबईतले सर्व खड्डे दूर करून काँक्रिटचे रस्ते करायचे. यासाठी साडेपाच हजार कोटींचं टेंडरींग प्रोसेस सुरू झालं.

- Advertisement -

मुंबईच्या सौंदर्यात भर घालण्याचं काम पुढच्या तीन महिन्यांत करणार आहोत. घरा-घरातील चाळींमध्ये आणि झोपडपट्टींमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने जो दवाखाना ठाण्यात सुरू केलाय, तो सर्व ठिकाणी सुरू करू, आरोग्य सुविधा आम्ही वाढवूय. पोलिसांची वीस हजार पदं आम्ही भरतोय. ७५ हजार नोकऱ्या तुम्ही थांबवल्या होत्या. त्या आम्ही भरत आहोत. पोलिसांचं हाऊसिंग लोण आम्ही सुरू केलंय, असं शिंदे म्हणाले.


हेही वाचा : आम्ही गद्दारी नाही गदर केलाय, एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -