शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांचे अॅनिमेशन अन् 51 फुटी तलवारीचे शस्त्रपूजन; वाचा कसा असेल मेळावा?

eknath shinde dasara melava balasahebs animation 51 feet sword dussehra mela

शिवसेना आणि शिंदे गटाच्या दसऱ्या मेळाव्यावरून सध्या राजकारणात बरीच चर्चा रंगतेय. अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष या दोन्ही मेळाव्यांकडे आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पहिल्या दसऱ्या मेळाव्यासाठी राज्यभरातील कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आहे. हा दसरा मेळावा ठाकरे आणि शिंदे गटाच्या भवितव्याचा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. यामुळे ठाकरे गटाकडूनही जोरदार तयारी सुरु आहे. दोन्ही गटाच्या मेळाव्यांसाठी राज्यातील कोनाकोपऱ्यातून लाखो कार्यकर्ते मुंबईत दाखल होत आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर होणाऱ्या पहिल्या दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने मोठी रणनीती आखली आहे. शिंदे गटाने होलोग्राम टेक्नॉलॉजीचा वापर करुन बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमेला अॅनिमेशनच्या रुपात मंचावर उभारण्यात येणार आहे. यावेळी शिंदे गटाकडून 51 फुटी बाहूबली तलावरीचं शस्त्रपूजनही केलं जाणार आहे.

दसरा मेळावा म्हटलं की बाळासाहेब ठाकरं हे समीकरण लक्षात घेत शिंदे गटाने बाळासाहेबांच्या जुन्या 40 व्हिडीओ क्लिप मंचावर दाखवण्याची तयारी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणादरम्यान हे व्हिडीओ दाखवण्यात येणार आहे. उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांशी कशी तडजोड केली हे यामाध्यमातून सांगितले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या कार्याक्रमादरम्यान 51 फुटी तलवारीचे शस्त्रपूजन केले जाणार आहे. यासोबत राज्याचे मुख्यमंत्री उदय सामंत यांच्याकडून एकनाथ शिंदे यांना 12 फुटी चांदीची तलवार देण्यात येणार आहे. या आधी गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये 11 फुट चांदीच्या तलवारीची नोंद झाली आहे, त्यामुळे ही तलवारही नवा विक्रम करणार आहे.

5 लाख वडापावांसह इतर चविष्ट खाद्यपदार्थांची तयारी

विशेष म्हणजे शिंदे गटाने मेळाव्यासाठी दोन ते तीन लाख लोक येणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटाने आपल्या कार्यकर्त्यांची जेवणाची व्यवस्था अचूक ठेवली आहे. सभेसाठी आलेल्या राज्यभरातील कार्यकर्त्यांसाठी शिंदे गटाने धपाटे, चटणी, कचोरी याबरोबरच एक गोड पदार्थ देण्यात येणार आहे. ही सर्व व्यवस्था ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी 400 बाय 1200 फुटाचा मंच उभारला आहे. या मंचावर ठाकरे गटातील व्यक्तीही दिसणार आहे. उद्याच्या या मेळाव्यासाठी आठ वक्त्यांची यादीही तयार करण्यात आल्याची माहिती आहे.