घरमहाराष्ट्रएकनाथ शिंदेंनी ट्विटरवरून शिवसेना नाव हटवलं, पुढची भूमिका काय?

एकनाथ शिंदेंनी ट्विटरवरून शिवसेना नाव हटवलं, पुढची भूमिका काय?

Subscribe

बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नसल्याचंही एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत सांगितलंय

मुंबईः मराठवाडा, कोकण, ठाण्यातील किमान 20 आमदारांसह शिवसेनेचे नगर विकासमंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री गुजरातमधील एका हॉटेलमध्ये थांबल्यानं राजकीय वर्तुळात मोठ्या उलथापालथी झाल्या आहेत. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात खुलासा करणार होते, पण त्यापूर्वीच त्यांनी ट्विट करत त्यांनी आपलं म्हणणं मांडलं आहे.

आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत, बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली, बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नसल्याचंही एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत सांगितलंय.

- Advertisement -

पण विशेष म्हणजे हे ट्विट करण्याआधीच त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून शिवसेना हे नाव हटवलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी शिवसेना सोडल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगलीय. तर दुसरीकडे शिवसेनेनंही एकनाथ शिंदेंची बंडाळी मोडून काढण्यासाठी त्यांना विधानसभेच्या गटनेतेपदावरूनच हटवलं आहे. एकनाथ शिंदे हे सध्या गुजरातमध्ये आहेत. त्यांच्यासोबत काही समर्थक आमदार असल्याने महाविकास आघाडी सरकार धोक्यात असल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे. दरम्यान, याआधी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तीन प्रस्ताव दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

एकनाथ शिंदे यांनी 2 वाजून 32 मिनिटांनी यांनी हे ट्विट केले. आपल्या ट्विटमध्ये एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेच्या नेतृत्व अधोरेखित केले. मात्र उद्धव ठाकरे यांचा उल्लेखही एकनाथ शिंदे यांच्या ट्विटमध्ये केला नसल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. अवघ्या काही मिनिटांच्या आत त्यांचं हे ट्विट व्हायरल झाले आहे.

- Advertisement -

दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची विधान भवनाच्या गटनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदेंच्याऐवजी आमदार अजय चौधरी यांची शिवसेनेच्या विधान भवनातील गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेना आणि अपक्षांसह ३५ आमदार असल्याची माहिती आहे. शिवसेनेच्या आमदारांनी मोठ्या प्रमाणावर बंडाळी केल्याने उद्धव ठाकरे यांनी दुपारी वर्षा बंगल्यावर तातडीने बैठक बोलवली होती.


हेही वाचाः विधीमंडळाच्या गटनेते पदावरून एकनाथ शिंदेंची हकालपट्टी; अजय चौधरी नवे शिवसेनेचे गटनेते

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -