Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रShiv Sena Shinde Faction : शिवसेना गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची एकमताने निवड;...

Shiv Sena Shinde Faction : शिवसेना गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची एकमताने निवड; लाडक्या बहिणींचे मानले आभार

Subscribe

मुंबई – विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले आहे. महायुतीतील प्रमुख घटकपक्ष शिवसेनेच्या गटनेतेपदी आज रात्री एकनाथ शिंदे यांनी एकमताने निवड करण्यात आली आहे. मुंबईतील ताज लँड्स हॉटेलमध्ये शिवसेना (एकनाथ शिंदे) आमदारांची बैठक झाली, यामध्ये एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे.

महायुतीला विक्रमी बहुमत मिळाले आहे. भारतीय जनता पक्षाचे 132 उमेदवार निवडून आले तर शिंदेंच्या शिवसेनेचे 57, अजित दादांच्या उमेदवारांचा 41 जागांवर विजय झाला आहे. महायुतीला 230 जागा मिळाल्या आहेत. भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आल्यामुळे आता मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा होणार यावरुन महायुतीत रस्सीखेच सुरु आहे. त्यातच शिवसेनेने गटनेतेपदी शिंदेंची निवड करण्यात आली आहे. उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाचा ठराव मांडला. प्रताप सरनाईक यांनी ठरावाला अनुमोदन दिले. त्यानंतर सर्व आमदारांनी एकमताने ठराव मंजूर केला. ठरावाची प्रत आता राज्यपालांना दिली जाणार आहे.  दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदारांचीही आज सकाळी बैठक झाली. त्यात अजित पवार यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली.

- Advertisement -

हेही वाचा : Maratha Reservation : तू पुन्हा आला की मी पुन्हा बसणार; मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीसांना इशारा

लाडक्या बहिणींचे मानले आभार

यावेळी आमदारांना मार्गदर्शन करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, लाडक्या बहिणींनी राज्यात इतिहास घडवला आहे. राज्यात लाडकी बहिण योजना सुपरहीट झाली. माझी बहिण लाडकी, विरोधकांच्या मनात भरली धडकी, तर काही लोकं फिट येऊन चक्कर येऊन पडल्याचे सांगत विरोधकांवर त्यांनी टीका केली. एक दैदिप्यमान विजय आपल्याला मिळाला आहे. विरोधकांना विरोधी नेता बनवायला संख्या नाही, तुम्ही साफ धूऊन टाकलंय अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदेंनी आमदारांच्या विजयाचे स्वागत केले.

- Advertisement -

आमदारांना आणण्यासाठी विशेष विमान हैदराबादला

यावेळी कळमनुरीचे आमदार संतोष बांगर हे हैदराबादहून विशेष विमानाने बैठकीला हजर राहिले होते. निकाल लागल्यानंतर नवनिर्वाचित आमदार हे वैद्यकीय कामासाठी हैदराबादला गेले होते. त्यांच्यासाठी शिंदेंनी विशेष विमान हैदराबादला पाठवले. आज सायंकाळी ते विशेष विमानाने मुंबईत पोहोचले.

एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली त्यावेळी मंचावर शिंदे यांच्यासह आमदार भरत गोगावले आणि निलम गोऱ्हे उपस्थित होत्या. आमदार अब्दुल सत्तार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजे.

लाडक्या बहिणींना लवकरच 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये

आमदारांच्या बैठकीआधी वर्षा या शासकीय निवासस्थानी लाडक्या बहिणींनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेना महायुतीच्या जाहीरनाम्यातील वचनाप्रमाणे राज्यातील लाडक्या बहि‍णींना लवकरच 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देण्यात येतील, असे जाहीर केले.

हेही वाचा : Rashmi Shukla : देवेंद्र फडणवीसांसह रश्मी शुक्लांचे कमबॅक होणार? निकालानंतर घेतली गृहमंत्र्यांची भेट

Edited by – Unmesh Khandale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -