घरताज्या घडामोडीउद्या मुंबईत येऊन फ्लोअर टेस्ट करणार, एकनाथ शिंदेंची माहिती

उद्या मुंबईत येऊन फ्लोअर टेस्ट करणार, एकनाथ शिंदेंची माहिती

Subscribe

आम्ही सर्व आमदारांना घेऊन उद्या मुंबईत पोहोचणार असल्याचंही यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Government) धोक्यात आले आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्याने राज्यात सत्तांतर होणार की महाविकास आघाडीचेच सरकार पाच वर्षे पूर्ण करेल याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलेले असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे उद्या मुंबईत दाखल होणार आहेत. सर्व आमदारांसह ते उद्या मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनीच दिली. त्यांनी आज गुवाहाटीत पत्रकारांशी संवाद साधला. (Eknath Shinde will come mumbai tomarrow for floor test)

हेही वाचा – राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, उद्या होणार बहुमत चाचणी

- Advertisement -

बंडखोर आमदार एकनाथ शिंदे आज पहाटेच कामाख्या देवीच्या दर्शानाला गेले होते. दर्शन करून आल्यावर पत्रकारांनी त्यांना घेरलं. त्यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्राच्या जनतेला चांगले सुगीचे दिवस येवोत, महाराष्ट्राच्या जनतेला सुख समाधान मिळावं म्हणून देवीचं दर्शन घ्यायला आलोय. देवीचं आशिर्वाद घ्यायला आलो आहे. माँ कामाख्या देवीच्या भूमिमध्ये आल्यावर तिचं दर्शन घेणं हा श्रद्धेचा भाग झाला. महाराष्ट्राच्या जनतेच्या सुखासाठी समृद्धीसाठी दर्शन घेतलंय.

हेही वाचा – महाराष्ट्र से उडा, गुवाहाटी में अटका!

- Advertisement -

त्यानंतर एकनाथ शिंदे यांना मुंबईच्या परतीबाबत विचारलं असता ते म्हणाले की आम्ही उद्या सर्व आमदारांसह मुंबईत पोहोचणार आहोत. मुंबई पोहोचवल्यावर फ्लोअर टेस्टसह ज्या इतर प्रक्रिया राबवायच्या आहेत त्या पूर्ण केल्या जातील.

गेल्या आठवड्याभरापासून एकनाथ शिंदे आणि तब्बल ४० आमदार गुवाहाटीत तळ ठोकून आहेत. राज्यातील सरकार अस्थिर करून एकनाथ शिंदे गुवाहाटीत बसून पुढची रणनीती आखत होते. दरम्यान, आता पुढे नेमकं काय होणार? महाविकास आघाडी सरकार बहुमत सिद्ध करू शकेल की सत्तांतर होईल याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -