घरताज्या घडामोडी'अनिल देशमुखांचे 100 खोके, बारामती एकदम ओके'; आमदार महेश शिंदेंची विरोधकांवर टीका

‘अनिल देशमुखांचे 100 खोके, बारामती एकदम ओके’; आमदार महेश शिंदेंची विरोधकांवर टीका

Subscribe

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरूवातीपासून विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षाकडून आंदोलन केले जात आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले जात आहे. त्यानंतर आज शिंदे गटातील आमदार आणि राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये जोरदार राडा झाला.

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरूवातीपासून विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षाकडून आंदोलन केले जात आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले जात आहे. त्यानंतर आज शिंदे गटातील आमदार आणि राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये जोरदार राडा झाला. सत्ताधारी आणि विरोधक आमदार एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचे पाहायला मिळाले. या राड्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे गटातील आमदार महेश शिंदे यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप करत वातावरण चिघळले असे म्हटले. त्यावर आता आमदार शिंदे यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. (eknath shinde group MLA mahesh shinde slam ncp mla amol mitkari)

“आम्ही लोकशाहीतील अधिकारानुसार शांततेने विधानभवनाच्या पायऱ्यांवर ते येण्याआधी पासूनच आंदोलन करत होतो. “अनिल देशमुखांचे 100 खोके, बारामती एकदम ओके” अशा घोषणा आम्ही देत होतो. या त्यांच्या जिव्हारी लागल्याचं दिसलं. अमोल मिटकरी यांनीच अर्वाच्य भाषेत बोलायला सुरुवात केली”, असा आरोप आमदार महेश शिंदे यांनी केला. तसेच, “गेल्या चार दिवसांपासून विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आमच्याबाबत “50 खोके, एकदम ओके” अशा घोषणाबाजी करण्यात येत होत्या. आम्ही काही न बोलता बाजूने जात होतो. पण आज जेव्हा आम्ही गेल्या अडीच वर्षात राष्ट्रवादीकडून केल्या गेलेल्या भ्रष्टाचाराबाबत बोललो तर त्यांना चांगलेच झोंबलेले दिसतेय. जे अमोल मिटकरी 50 खोके ओरडत आहेत. त्यांना माझे आव्हान आहे की गेल्या अडीच वर्षात अजित पवार यांनी बारामतीला किती पैसा पाठवला याची माहिती घ्यावी मग खोके खोके ओरडावं”, असे महेश शिंदे म्हणाले.

- Advertisement -

“अमोल मिटकरी कोणत्यापद्धतीची विधाने करतात त्याची कल्पना संपूर्ण महाराष्ट्राला आहे. मला त्यावर अधिक बोलण्याची गरज नाही. आम्ही शांततेने आंदोलन करत होतो. पण मिटकरींनी आम्हाला चिथवण्याचे काम केले. मिटकरी हे लोकशाहीवादी नेते नाहीत. त्यांची विचारसरणी सर्वांना माहित आहे. माझी त्यांच्या पक्षश्रेष्ठींना विनंती आहे. त्यांनी अमोल मिटकरींच्या वागण्याकडे लक्ष द्यावे”, असेही महेश शिंदे यांनी म्हटले.


हेही वाचा – उपमुख्यमंत्री साहेब गोलमाल उत्तर देऊ नका; विधानसभेतच आमदार सुहास कांदे फडणवीसांवर भडकले

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -