घरमहाराष्ट्रसंजय राऊत शरद पवारांचे प्यादं होतं, त्याच काम आता संपलं; संजय शिरसाटांचा...

संजय राऊत शरद पवारांचे प्यादं होतं, त्याच काम आता संपलं; संजय शिरसाटांचा घणाघात

Subscribe

राऊतांना ईडीने अटक केल्यानंतर शिवसेनेच्या एकाही नेत्याने छातीठोकपणे मी त्यांच्या पाठीशी उभा आहे असे म्हटले का? असा सवालही शिरसाटांनी उपस्थित केला

शिवसेना खासदार संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी एक प्यादा होते. या प्यादाचं काम आता संपलं आहे. ही गोष्टी शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यानेही ओळखली आहे, त्यामुळे आता शरद पवार यावर प्रतिक्रिया देणार नाहीत, अशा शब्दात शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. शिवसेना फुटल्यामुळे आता संजय राऊत यांची उपयुक्तता संपली आहे. त्यामुळे संजय राऊतांच्या अटकेवर शरद पवार साधी प्रतिक्रिया द्यायला तयार नाहीत असा आरोपही शिरसाट यांनी केला आहे.

हेही वाचा : राज्यपालांचे वादग्रस्त वक्तव्य : राजभवनावर जाणारा राष्ट्रवादीचा मोर्चा पोलिसांनी अडवला

शिरसाट पुढे म्हणाले की, संजय राऊतांना आता त्यांची लायकी कळेल, ज्यांच्यासाठी संजय राऊतांनी शिवसेना संपवली, शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली, त्या कर्माची फळं आता राऊतांना भोगावी लागत आहेत. शरद पवारांच्या स्वत:च्या पक्षातील दोन नेते तुरुंगात आहेत. त्यांच्यावर शरद पवार काही बोलले नाहीत, तर मग संजय राऊतांवर बोलयला राऊत कोण लागून गेले असा सवालही शिरसाट यांनी उपस्थित केला. सोमवारी ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

- Advertisement -

संजय राऊत यांनी शिवसेना फोडण्याचे काम केले. संजय राऊत हे शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीसोबत आहे. हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. राऊत यांनी नेहमी राष्ट्रवादीला पूरक अशी भूमिका घेतली, त्यामुळे आता शिवसेनेतील कोणताही नेता त्यांच्या पाठीशी उभा राहणार नाही. राऊतांना ईडीने अटक केल्यानंतर शिवसेनेच्या एकाही नेत्याने छातीठोकपणे मी त्यांच्या पाठीशी उभा आहे असे म्हटले का? असा सवालही शिरसाटांनी उपस्थित केला.

शरद पवार स्वत;चा पक्ष वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करतात. त्यांचा पक्ष वाढविण्यासाठी शरद पवार यांनी ही खेळी केली होती. शिवसेना पक्ष फोडण्यात ते यशस्वी ठरले. शिवसेना फुटल्यानंतर सर्वात जास्त आनंद हा शरद पवारांना झाला असेल, असा आरोपही संजय शिरसाट यांनी केला आहे.


हेही वाचा : राज्यात नक्की कोण मुख्यमंत्री?,आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -