घरताज्या घडामोडीउद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेतून दिशाभूल केली; खासदार राहुल शेवाळेंचा आरोप

उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेतून दिशाभूल केली; खासदार राहुल शेवाळेंचा आरोप

Subscribe

पक्षाच्या घटनेत कुठेही लोकशाही प्रक्रिया नाही, शिवसेनेत कधी निवडणूक झाली नाही. शाखाप्रमुखांनी कधी मतदान केले नाही. केवळ शिवसैनिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन केला असा गंभीर आरोप राहुल शेवाळे यांनी केला आहे.

पक्षाच्या घटनेत कुठेही लोकशाही प्रक्रिया नाही, शिवसेनेत कधी निवडणूक झाली नाही. शाखाप्रमुखांनी कधी मतदान केले नाही. केवळ शिवसैनिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन केला असा गंभीर आरोप राहुल शेवाळे यांनी केला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या घटनेवर आक्षेप घेतल्याचेही त्यांनी सांगितले. (Eknath Shinde Group Mp Rahul Shewale Slams Uddhav Thackeray)

“उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत लोकांची दिशाभूल केली. 1998ला निवडणूक आयोगाने या घटनेत लोकशाही प्रक्रिया फॉलो केली जात नाही असे सांगत शिवसेना प्रमुखांसोबत 30 वेळा पत्र व्यवहार केला. त्याचा या घटनेवर निवडणूक आयोगाचा आक्षेप होता. निवडणूक आयोगाने नोंदणी रद्द केली जाईल असे सांगतिल्यावर बाळासाहेब ठाकरेंनी पक्षातंर्गत लोकशाही प्रक्रिया पार पाडू अशी हमी दिली होती. त्यानंतर ज्या नियुक्या झाल्या त्या लोकशाही मार्गाने झाल्या. 2013 आणि 2018 नंतर शिवसेनाप्रमुख पद तसेच ठेवत शिवसेना पक्षप्रमुखपद निर्माण केले”, अशा शब्दांत खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

- Advertisement -

2013 आणि 2018 नंतर अनिल देसाई यांनी जी प्रक्रिया सांगितली त्या प्रमाणे निवडणूक होते, अर्ज मागविले जातात, 2013 आणि 2018 मध्ये कुणी अर्ज केला. पक्षप्रमुख पदासाठी तेव्हा आमचा उद्धव ठाकरेंना सर्वांचा पाठिंबा होता. मात्र नेते, उपनेते, विभागप्रमुख, संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुखासाठी मतदान झाले का? मुंबईच्या गटप्रमुखांनी कधी मतदान करून शाखाअध्यक्ष ते नेते पदासाठी मतदान केले?”, असे सवाल उपस्थित करत खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

“उद्धव ठाकरे आणि सचिवांनी मिळून सर्व नियुक्त्या केल्या. त्यामुळे लोकशाहीच्या माध्यमातून काहीच नियुक्त्या झाल्या नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय त्यांना माहिती नाही हे अगदी दुर्देवी आहे. शिवसेनेत अजून कोणतीच निवडणूक झाली नाही. तशी प्रक्रिया झाल्याचे त्यांनी सिद्ध करावे, ही पत्रकार परिषद केवळ सहानुभूती मिळविण्यासाठी घेण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी ज्या मागणीसाठी युती तोडली ती अडीचवर्षे शिवसैनिकाला भाजपाने मुख्यमंत्री केले आहे. त्यामुळे त्यांची मागणी आता काही राहिली नाही”, असेही राहुल शेवाळे यांनी म्हटले.

- Advertisement -

हेही वाचा – ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ जाहीर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -