मी एकनाथ शिंदेंसोबतच, ते ट्वीट टेक्निकल प्रॉब्लेममुळे, संजय शिरसाटांचे स्पष्टीकरण

Sanjay Shirsat,

शिंदे फडणवीस सरकाराचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर 39 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर पार पडला. मात्र या मंत्रिमंडळ विस्तारावर शिंदे गटातील आमदार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यातच एकनाथ शिंदे यांच्या गटातील औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी आपली नाराजी काल ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केली, तसेच त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंकडे परतीच्या वाटेवर जाणार असल्याचा सुचक इशारा दिला. या ट्विटमुळे राज्यातील राजकारणात अनेकांच्या भुवया उंचावल्या. संजय शिरसाठ यांनी आपल्या ट्विटमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख असा उल्लेख करत त्यांचे विधानसभेतलं एक भाषण जोडलं होत. मात्र काही वेळात त्यांनी ते ट्विट हटवले, मात्र या ट्विटमुळे ते एकनाथ शिंदेंवर नाराज असल्याचे म्हणत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत परत जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र या चर्चांना संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन पूर्णविराम दिला आहे. मी एकनाथ शिंदेंसोबतच असल्याचे म्हणत मंत्रिपदासाठी दबाव आणला नाही असं स्पष्टीकरण शिरसाट यांनी दिले आहे. तसेच ते ट्विट माझ्या मोबाईलचा झालेला टेक्निकल प्रोम्बेल होता, असही शिरसाट म्हणाले आहेत.

संजय शिरसाट म्हणाले की, काल रात्री माध्यमाकडून फोन आला की, तुमच्या अकाऊंटवरून काहीतरी ट्विट झालं आहे. यावेळी मी भावनेच्या भरात हेही बोलून गेलो की, उद्धव ठाकरे हे आमचे कुटुंब प्रमुख होते आणि तीच भूमिका आम्ही योजित आहोत. पण हा सर्व माझ्या मोबाईलचा झालेला टेक्निकल प्रोम्बेल आहे, मागची पोस्ट ऑटोमॅटिक फॉरवर्ड कशी झाली सांगता येणार नाही. पण हे निश्चित आहे की, आम्ही उद्धव ठाकरेंना वारंवार सांगत होतो की, तुम्ही शिवसेना पक्षप्रमुख म्हणून रहा आणि सत्ता इतरांच्या हाती सोपवा यातून एक चांगलं सरकार महाराष्ट्राला देऊ. याबाबत जेव्हा सर्व आमदारांनी तक्रारी केल्या, त्या सर्व तक्रारी एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या कानावर घातल्या होत्या. ठरल्याप्रमाणे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते आणि तर उद्धव ठाकरे पक्षप्रमुख राहिले असते तर आजचा विचार हा पक्षा वाढीस लागला असता. परंतु माझ्या मोबाईलवरून ती झालेली एक चुक म्हणा किंवा तांत्रिक अडचण म्हणा, ती पोस्ट फॉरवर्ड झाली, त्या गोष्टीचे मी आज समर्थन करणार नाही, मी एकनाथ शिंदेंसोबत आहे आणि शिंदेंसोबतच राहणार आहे. यामध्ये दुसरी कोणती अडचण येता कामा नये किंवा चुकीचा संदेश जाऊ नये. मी कोणताही दबाव तंत्राचा वापर केला आहे, माझी भूमिका मी स्पष्टपणे ज्यांच्यासमोर मांडायची होती त्यांच्यासमोर मांडली आहे. त्यामध्ये कधीही कॉम्प्रोमाईज केलं नाही. दबाव तंत्र आणणं आणि पाहा आता काही तरी उठाव करतो हे दाखवणं माझ्या स्वभावात नाही. असे मी स्पष्ट करतो.


‘या’ राज्यांमध्ये पावसाचा कहर, महाराष्ट्रात 14 ऑगस्टपर्यंत रेड अलर्ट, IMD चा सतर्कतेचा इशारा