… तर वेळ पडल्यास पवारांच्या घरी जाऊन दिलगिरी व्यक्त करेन: केसरकरांची भूमिका

त्याकाळातही शिवसेनेची बार्गेनिंग पावर कमी झाली होती, या घडलेल्या घटना आहेत. या घडलेल्या घटनांचा आणि त्याबद्दल चुकीचं वक्तव्य करण्याचा काहीही संबंध येत नाही. अस स्पष्टीकरण देखील केसरकरांनी दिले

eknath shinde group spokeperson deepak kesarkar apologize sharad pawar for controversial statement

शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली तेव्हा त्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा हात होता, असा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे. या आरोपांवरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. दरम्यान यानंतर आता दीपक केसरकर यांनी माध्यमांसमोर शरद पवारांची जाहीर माफी मागितली आहे. शरद पवार महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहे, प्रत्येकाला त्यांचा आदर आहे. त्यामुळे चुकून सुद्धा माझ्या तोंडून शरद पवारांबद्दल एखादा चुकीचा शब्द निघाला असेल तर मी त्यांची जाहीर दिलगिरी व्यक्त करतो. आवश्यकता असेत तर मी पवार साहेबांच्या घरी जाऊन दिलगिरी व्यक्त करेन, अशी भूमिका केसकरांनी जाहीर केली. आज सकाळी ते माध्यमांशी बोलत होतो.

“पवारांबद्द्ल एक अपशब्द माझ्या तोंडून येऊ शकत नाही”

यावेळी केसरकर म्हणाले की, मी दिलेल्या वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा उल्लेख होता. परंतु मी शरद पवारांबद्दल कधीही अपशब्द वापरला नाही. माझ्या जीवनाच्या जडघडणीमध्ये ज्या नेत्यांचा मोठा वाटा आहे त्यापैकी एक शरद पवार आहे, त्यामुळे त्यांच्याबद्दल एकही अपशब्द माझ्या तोंडून येऊ शकत नाही.

शिवसेनेत फूट पडली त्यासंदर्भात वक्तव्ये केली होती ती घडलेली वस्तूस्थिती होती. त्यामुळे वस्तूस्थितीचा उल्लेख केला. 2014 मध्ये वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या त्यानंतर सरकार स्थापन झालं त्यावेळी देखील पवारांनी आपली भूमिका जाहीर केली, भाजपला त्यांनी बिनशर्थ पाठींबा जाहीर केला, त्यामुळे त्याकाळातही शिवसेनेची बार्गेनिंग पावर कमी झाली होती, या घडलेल्या घटना आहेत. या घडलेल्या घटनांचा आणि त्याबद्दल चुकीचं वक्तव्य करण्याचा काहीही संबंध येत नाही. अस स्पष्टीकरण देखील केसरकरांनी दिले.

“आव्हाड मला भेटायला आले होते हे मात्र ते…” 

पवारसाहेबांच्या वतीने मला भेटायला आल्याचे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले. आव्हाड मला भेटायला आले होते हे खरं आहे. मात्र, ते नारायण राणे यांच्या मुलाचा प्रचार करा हे सांगायला आले होते. ते अजिबात पवार साहेबांचा निरोप घेऊन माझ्याकडे आले नव्हते असा खुलासा केसरकरांनी केला. ते पुढे म्हणाले की, पवारसाहेब ज्या दिवशी सावंतवाडीला आले त्या दिवशी मी माझ्या मतदारसंघात होतो. त्यावेळी मी माझा राजीनामा पवार साहेब यांच्याकडे दिला. तो अत्यंत नम्रपणाने दिला, मी तुमच्यामुळे आमदार आहे. मात्र, मी राणे यांच्या मुलाचा प्रचार करु शकत नसल्याचे पवरसाहेबांना सांगितले असल्याचे केसरकर म्हणाले, त्यावेळी मी तुमच्याबरोबर येऊ शकत नाही म्हणून आमदारकीचा राजीनामा देत असल्याचे पावरसाहेबांना सांगितल्याचेही केसरकर म्हणाले.

काय म्हणाले होते केसरकर?

शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली तेव्हा त्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा हात होता, दरम्यान नारायण राणेंना शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी पवारांनीच मदत केली, तर शिवसेना सोडताना राज ठाकरेंच्या पाठीशीही शरद पवारांचे आशीर्वाद होते, असे गंभीर आरोप केसरकरांनी केले.

महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा त्यामागे शरद पवार होते ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी शिवसेना का फोडली? बाळासाहेब जिवंत होते तेव्हा त्यांना यातना का दिल्या? याचे उत्तरही त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिले पाहिजे. असही केसरकर म्हणाले होते.


सरकार कोणत्याही शब्दांवर बंदी घालू शकत नाही; लोकसभा सभापती ओम बिर्ला स्पष्टच म्हणाले…