Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रEknath Shinde : दावोसमधील गुंतवणुकीवर विरोधकांचे प्रश्न, एकनाथ शिंदेंनी पलटवार करत म्हटले...

Eknath Shinde : दावोसमधील गुंतवणुकीवर विरोधकांचे प्रश्न, एकनाथ शिंदेंनी पलटवार करत म्हटले –

Subscribe

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज आपल्या काही आमदार आणि खासदार यांच्यासोबत कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला गेले होते. दर्शनानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना विरोधकांकडून दावोस दौऱ्यावर करण्यात येणाऱ्या टीकेबाबत विचारणा करण्यात आली.

कोल्हापूर : यंदाच्या दावोस दौऱ्यातील बैठकीला राज्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत गेले होते. यावेळी फडणवीसांच्या नेतृत्वात विक्रमी अशी गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यात आली आहे. यामुळे लाखोंचा रोजगार निर्माण झाला आहे. परंतु, दावोस दौऱ्यातील गुंतवणुकीची आकडेवारी फुगवून सांगितली आहे. तर दावोस दौऱ्यात जाऊन गुंतवणूक केलेल्या बहुतांश कंपन्या या महाराष्ट्रातील असल्याने फडणवीसांना दावोसला जाण्याची गरज नव्हती, असे विरोधकांकडून सांगण्यात येत आहे. विरोधकांच्या विविध आरोपांना आणि प्रश्नांना आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राज्याच्याबाबतीत जे काही चांगले होते, ते विरोधकांना पाहावत नाही, असे शिंदेंनी म्हटले आहे. (Eknath Shinde hits back at opposition question on investment in Davos)

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज आपल्या काही आमदार आणि खासदार यांच्यासोबत कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला गेले होते. दर्शनानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना विरोधकांकडून दावोस दौऱ्यावर करण्यात येणाऱ्या टीकेबाबत विचारणा करण्यात आली. याबाबत उपमख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, दावोसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत या दोघांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षी अत्यंत विक्रमी करारनामे झाले आहेत. या वर्षी 15 लाख करोडपेक्षा जास्तीचे करारनामे झाले आहेत आणि यामुळे लाखो लोकांना रोजगार मिळणार आहेत. त्यामुळे विरोधकांना साहाजिकच चांगले झालेले बघायला आवडत नाही. मी मुख्यमंत्री असताना जेव्हा दावोसला गेलो होतो, तेव्हा मी 7.50 लाख कोटींचे करार दोन्ही वेळेत झाले होते, अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली.

हेही वाचा… Prithviraj Chavan : निवडणूक आयोगाने वाढवलेल्या मतदारांमुळे महायुतीचा विजय, चव्हाण यांचा आरोप

तसेच, माझ्या कार्यकाळात जे करार झाले, त्याची 70 ते 80 टक्के अंमलबजावणी देखील झाली. त्यामुळे यापूर्वी करारनामे कसे होत होते, हे सर्वांना माहीत आहे. त्याची अंमलबजावणी कशी होत होती, हे सुद्धा माहीत आहे. पण महायुतीच्या काळात मागच्या अडीच वर्षात लाखो लोकांना रोजगार मिळाला, राज्यात उद्योगही आले. आता एकूण परदेशी गुंतवणुकीपैकी देशातील एकूण 52 टक्के परदेशी गुंतवणूक एकट्या महाराष्ट्राकडे आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात उद्योग नगरी होऊ लागले आहेत. महाराष्ट्राकडे उद्योग आकर्षित होत असून लोकांना काम मिळत आहे, हे लोकांना पाहावत नाहीये. ज्यामुळे अशा प्रकारे टीका होत आहे. पण आम्ही अशा प्रकारच्या टीकेला टीकेने उत्तर न देता कामाने उत्तर देऊ, असे प्रत्युत्तर यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आले.