मुंबई : राज्यात सध्या सर्वत्र आगामी मुख्यमंत्री कोण असणार याची चर्चा सुरू आहे. त्यातच विधानसभेच्या निकालाला आठवडा होऊन गेला तरीही अद्याप महायुतीच्या चर्चा आणि बैठकांचे सत्र सुरूच आहे. याच दरम्यान आज मुंबईत होणारी महायुतीची बैठक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दोन दिवसानंतर अमित शहांचा फोन आल्यानंतर पुन्हा बैठक होईल असे सांगण्यात आले आहे. तसेच आता काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील साता-याला आपल्या गावी गेल्यामुळे महायुतीची बैठक होणार नसल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे. (Mahayuti meeting cancelled Todys.)
हेही वाचा : Congress Survey : निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला मिळाले होते पराभवाचे संकेत
महायुतीला प्रचंड बहुमत मिळून देखील मुख्यमंत्री आणि खातेवाटपावरून नाराजी नाट्य सुरू असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. शिवसेनेने गृह खात्यावर दावा केला आहे, मात्र अद्याप भाजपाकडून या दाव्यावर अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. दरम्यान काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर राज्यातील महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. त्यानंतर आज मंत्रिमंडळाच्या खातेवाटपासंदर्भात मुंबईत महत्त्वाची बैठक होणार होती. मात्र काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक सातारा जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी गेल्याने महायुतीची आजची बैठक रद्द करण्यात आल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
हेही वाचा : Rohit Pawar : “अजितदादा ‘CM’ झाले तर मी स्वत:…”, रोहित पवारांचं विधान चर्चेत
दिल्लीतील कालच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत असताना एकनाथ शिंदे यांनी वक्तव्य केले होते. यावेळी अमित शहा यांच्यासोबत सकारात्मक बैठक झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच मुंबईत भाजपाची बैठक होणार असल्याची माहिती देखील यावेळी त्यांनी दिली होती. त्यानंतर पुढील निर्णय होईल, असे ते म्हणाले आहेत. दिल्लीमधील आमची बैठक सकारात्मक झाली असून अमित शहा, जे पी नड्डा यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे. माझी भूमिका मी जाहीर केली असून मी शिवसेना म्हणून महायुतीच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. मी काळजीवाहू मुख्यमंत्री आहे, मी सगळ्यांची काळजी घेतो आहे, असेही एकनाथ शिंदेंनी यावेळी स्पष्ट केले आहे.
Edited By Komal Pawar Govalkar