Homeमहाराष्ट्रEknath Shinde : ऑपरेशन टायगरवर काय म्हणाले एकनाथ शिंदे?

Eknath Shinde : ऑपरेशन टायगरवर काय म्हणाले एकनाथ शिंदे?

Subscribe

पुणे : पुण्यामध्ये शुक्रवारी (31 जानेवारी) मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच मंचावर दिसले. महाराष्ट्र मंडळाच्या इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी हे दोघे एकत्र आले होते. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी त्यांना शिवसेनेचे ऑपरेशन टायगर सुरू आहे का? अनेक बडे नेते पक्षप्रवेश करणार आहेत का? याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, “आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचे सरकार स्थापन केले. त्या दिवसापासून हा पक्षप्रवेशाचा ओघ सुरू आहे. दररोज महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून, तालुक्यातून अनेकजण पक्षप्रवेश करत आहेत. यात काही नवीन विषय नाही,” अशी प्रतिक्रिया दिली. (Eknath Shinde on Mission Tiger opposition party leaders meeting)

हेही वाचा : Girish Mahajan : नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी भाजपाचा आग्रह का? गिरीश महाजनांनी सांगितलं कारण 

गुरुवारी (30 जानेवारी) काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांच्यासह महाविकास आघाडीचे 6 नेते हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले की, “मला अनेक मंत्री भेटायला येतात. मी राज्याचा उपमुख्यमंत्री असून नगरविकास मंत्रीही आहे. त्यामुळे माझ्याकडे कामानिमित्त भेटायला अनेक नेते येत असतात. मी कधीही कोणासोबत दुजाभाव केलेला नाही. मी मुख्यमंत्री असताना सर्व पक्षांचे लोकं मला भेटायचे. पण तुम्हाला सगळ्यांना आताच का शंका आणि प्रश्न पडतात?” असे म्हणत त्यांनी भेटीबाबत स्पष्ट सांगितले.

ऑपरेशन टायगर काय ?

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. तर नाराज असलेले नेते हे दुसऱ्या पक्षांमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे. अशामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये अनेक पक्षप्रवेश करण्यात येत असून शिवसेना ठाकरे गटाला आगामी काळात मोठा धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहे. अशामध्ये महाविकास आघाडीचे 6 बडे नेते हे शिवसेनेमध्ये जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि हुसेन दलवाई यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. याला ऑपरेशन टायगर असे नाव दिल्याचे बोलले जात आहे.

कोण-कोणते आमदार, खासदार शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात

  • रविंद्र धंगेकर, काँग्रेसचे माजी आमदार
  • महादेव बाबर, ठाकरे गटाचे माजी आमदार हडपसर
  • चंद्रकांत मोकाटे, कोथरूडचे माजी आमदार ठाकरे गट
  • गणपत कदम, रत्नागिरीचे माजी आमदार ठाकरे गट
  • सुभाष बने, संगमेश्वर माजी आमदार ठाकरे गट
  • रमाकांत म्हात्रे, कॅाग्रेस नेते आणि नवी मुंबईचे माजी महापौर