आम्हाला श्रेयवादात पडायचं नाही, सर्वांच्या मेहनतीने ओबीसी आरक्षण मिळालं- एकनाथ शिंदे

बाठिंया आयोगाचा जो अहवाल आहे तो अतिशय मेहनत करून अत्यंत डिटेलमध्ये न्यायालयात सादर केला. सरकारची बाजू प्रभावीपणे मांडली, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

eknath shinde

जे आधी ओबीसी आरक्षणाविरोधात होते ते आता श्रेय घेत आहेत. पण आम्हाला श्रेयवादात पडायचं नाही. सर्वांच्या मेहनतीने ओबीसी आरक्षण मिळालं, असं एकनाथ शिंदे म्हणाले. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ओबीसी आरक्षणासंदर्भातील माहिती पत्रकारांना दिली. (Eknath Shinde on OBC political reservaiton)

ओबीसी समाजाचा विजय झाला. त्यांच्या न्याय हक्काच्या लढ्याला यश मिळालं. ओबीसी समाजाला शब्द दिला होता, आरक्षण मिळवून देण्याचा तो शब्द आम्ही पाळला. बाठिंया आयोगाचा जो अहवाल आहे तो अतिशय मेहनत करून अत्यंत डिटेलमध्ये न्यायालयात सादर केला. सरकारची बाजू प्रभावीपणे मांडली, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा – मोठी बातमी! 16 आमदारांच्या अपात्रतेवरची सुनावणी पुढे ढकलली, आता 1 ऑगस्टला पुढची सुनावणी

ते पुढे म्हणाले की, ओबीसी आरक्षणासाठी बांठिया आयोगातील अधिकाऱ्यांसोबत चर्चा होत होती. मी स्वतः त्यांच्याशी संपर्कात होतो. इन डिटेलमध्ये त्यांनी माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ कॉन्सिल, तज्ज्ञ वकिल, तुषार मेहता यांनी सरकारची बाजू मांडली. मी नगरविकास मंत्री होतो तेव्हाही संपर्कात होतो. आताही आम्ही दोघांनी बाठिंया आयोगाशी पुन्हा चर्चा केली. त्यातून ज्या काही अडचणी होत्या त्या दूर केल्या. दिल्लीतही या कामासाठी तीन वेळा गेलो. त्यामुळे सर्वांनी आरक्षण मिळालं पाहिजे असं न्यायालयासमोर प्रभावीपणे मांडलं.

या सरकारचा पायगुण चांगला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेला अहवाल शुभसंकेत आहे. न्याय हक्काचा लढा ओबीसी समाजाने दिला त्याला यश प्राप्त झालंय, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात, कोर्टाच्या निकालानंतर जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य

मंत्रिमंडळ विस्तार न्यायालयीन कचाट्यात नाही

आमदारांच्या अपात्रेच्या याचिकेवर सुनावणी सुरू असल्याने मंत्रिमंडळ होत नाहीय, असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारला असता, ते म्हणाले की, मत्रिमंडळ विस्ताराचा न्यायालयीन प्रक्रियेशी काही संबंध नाही.