घरमहाराष्ट्रपावसाळी अधिवेशनात काव्यबहार! मुख्यमंत्री शिंदे यांना 'आठवले' आणि केल्या कविता...

पावसाळी अधिवेशनात काव्यबहार! मुख्यमंत्री शिंदे यांना ‘आठवले’ आणि केल्या कविता…

Subscribe

यंदाचे अधिवेशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कवितांमुळेही लक्षात राहणार आहे. गेल्या सहा दिवसांत चाललेल्या या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी तीन दिवस केलेल्या कवितांची छाप पुढील काही दिवस नक्कीच राहील.

मुंबई – सत्तासंघर्षानंतर झालेले पावसाळी अधिवेशन (Rainy Session in Maharashtra Assembly) अत्यंत वादळी ठरले. आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडल्या. पायऱ्यांवरून आंदोलन करून सत्ताधाऱ्यांवर विरोधकांनी निशाणा साधला. विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना सत्ताधाऱ्यांचाही विधानभवनाबाहेर तोल गेला आणि दोन्ही गटांत हाणामारी झाली. अशा विविध घटनांमुळे यंदाचे पावसाळी अधिवेशन सर्वांच्याच लक्षात राहणारे आहे. तसेच, यंदाचे अधिवेशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कवितांमुळेही लक्षात राहणार आहे. गेल्या सहा दिवसांत चाललेल्या या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी तीन दिवस केलेल्या कवितांची छाप पुढील काही दिवस नक्कीच राहील. (Eknath Shinde poem in rainy session in assembly)

हेही वाचा – …मी कंत्राटी मुख्यमंत्री म्हणून कधीही बरा, मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

- Advertisement -

महाराष्ट्रातील आगामी नगरपालिका निवडणुकांमध्ये नगराध्यक्षपदाची निवड थेट जनतेतून करण्याच्या निर्णयाला विधानसभेत २२ ऑगस्ट रोजी मंजुरी मिळाली. यावेळी विधानसभेत विरोधकांनी गोंधळ घातला. सरकारच्या या निर्णयाला विरोध केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून योजना राबवत असल्याचा आरोप विरोधकांनी त्यांच्यावर केला. तेव्हा दोन ओळी सादर करून एकनाथ शिंदे यांनी विधानसभेतील वातावरण हलकं फुलकं केलं. देवेंद्र और में है साथ साथ, मेरा नाम है एकनाथ असं एकनाथ शिंदेंनी म्हटल्यानंतर विधानसभेत एकच खसखस पिकली.

हेही वाचा – औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतर प्रस्तावाला विधानसभेत मंजुरी

- Advertisement -

पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कवितेतून शेतकऱ्यांना आवाहन केलं. शेतकऱ्यांनी आतम्हत्या करून नये असं एकनाथ शिंदे म्हणाले. ते म्हणाले की,

शेतकरी बांधवांनो, हा छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे
तुमचा जीव कोणत्याही झाडाला टांगण्याइतका स्वस्त नाही
तुम्ही आमची संपत्ती आहात
बाळासाहेब ठाकरे खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांना नेहमी म्हणायचे
तुम्ही रडायचे नाही, तुम्ही लढायचे
आणि शिवछत्रपतींची शपथ आहे सर्वांना
तुमचा तोलामोलाचा जीव असा वाऱ्यावर सोडून जाऊ नका
आत्महत्या करू नका
मी देखील तुमच्यासारख्या रांगड्या मनाचा साधासरळ माणूस आहे
मला तुमच्या वेदना कळतात, काळजाला भिडतात
आस्मानी संकटातून, सावकारी कर्जातून बाहेर काढण्यासाठी आमचं सरकार कटीबद्ध आहे
आत्मघातात पराभव असतो
आणि संघर्षात जगण्याचं लखलखतं यश सामावलेलं असतं
हे सरकार सतत २४ तास तुमच्यासोबत आहे
जीव देऊ नका, जीव लावूया एकमेकांना
चला नव्या सूर्याची नवी किरणे गाठीशी बांधुया
चला सर्वांनी मिळवून छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र नव्याने घडवुया

असं आवाहन वजा विनंती एकनाथ शिंदे यांनी सभागृहात शेतकऱ्यांना केली. ही कविता सादर करताच त्यांनी अजित पवारांवरही एक कविता केली.

किती संकटं येऊ द्या
आपण सर्व एकत्र येऊ या…

कशाला करायचे राजकारण
आपला उद्देश समाजकारण

एकमेकांना सहाय्य करुया
महाराष्ट्राला पुढे नेऊया

थांबवा आता शब्दांचे वार
आमचे मित्र अजित पवार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सादर केलेल्या या आठ ओळींच्या कवितेमध्ये शेवटच्या दोन ओळींमध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा उल्लेख आहे. पहिल्या सहा ओळी म्हणून झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोडं थांबले. त्यानंतर त्यांनी शेजारी बसलेल्या देवेंद्र फडणवीसांकडे पाहून, “हे नको ना?” असं विचारलं. त्यावर एकनाथ शिंदे यांच्या मागे बसलेल्या एका आमदाराने, “वाचा… वाचा” असं म्हटलं. दरम्यान, शेवटची ओळ वाचावी की वाचू नये या संभ्रमात एकनाथ शिंदे असताना देवेंद्र फडणवीस यांनी कवितेची शेवटची ओळ म्हटली आणि सभागृहामध्ये एकच हशा पिकला.

हेही वाचा बीडीडी चाळीतील पोलिसांना १५ लाखांत घर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाला आव्हान देत शिवसेनेत बंडाळी केली. आयुष्यभर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विरोध केल्यानंतर त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसायची वेळ आल्याने शिंदेंनी शिवसेनेतील ४० आमदारांना घेऊन भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा काँग्रेसला प्रखर विरोध होता हे स्पष्ट झालं. त्यांनी आज, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही कवितेच्या माध्यमातून त्यांचा हा विरोध स्पष्ट केला.

आता काँग्रेसची स्थिती पाहून येते दया..
महाविकास आघाडीची पुरती गेली रया..
दादा आणि अंबादास बसले..
काँग्रेसवाले हात चोळत बसले
तेव्हा इंदिराबाईंच्या हाताची एकेकाळी होती वट
टोमणे सेनेबरोबर आता झाली नुसती फरफट…

एकूणच यंदाचे अधिवेशन विरोधकांनी गाजवलेच तर एकनाथ शिंदे यांच्या काव्यपंक्तीमुळेही हे अधिवेशन स्मरणीय ठरले आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे डॉ. शंकरराव खरात जन्मशताब्दी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एक कविता म्हटली होती. “शिंदे आणि फडणवीस यांची जमलेली आहे जोडी, अडीच वर्ष चालणार आहे सत्तेची गाडी” ही कविता सादर करून रामदास आठवले यांनी राज्यातील सद्यस्थितीवर भाष्य केलं होतं. रामदास आठवलेंकडून कवितांची प्रेरणा घेत शिंदेंनीही अशाच कविता रचल्या की काय असं म्हणायला वाव आहे.

हेही वाचा – ‘तू इधर उधर की बात न कर’; प्रसाद लाड यांचा तुफान शेरोशायरीत मविआवर हल्लाबोल

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -