Maharashtra Assembly Election 2024
घरठाणेEknath Shinde : माझी अडचण होणार नाही...; शिंदेंनी केला फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदाचा मार्ग...

Eknath Shinde : माझी अडचण होणार नाही…; शिंदेंनी केला फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा

Subscribe

महायुतीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 230 जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता आणली. पण, निकाल लागून 3 ते 4 दिवस झाले तरी मुख्यमंत्री कोण होणार? हे समोर आले नव्हते. त्यानंतर राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

मुंबई : गेल्या काही काळापासून महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला भाजप हायकमांडकडून होकार मिळाल्याचे समोर आल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे समोर आले. तर, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्यासमोर भाजपने दोन पर्याय ठेवल्याचेदेखील समोर आले. त्यानंतर आज, बुधवारी (27 नोव्हेंबर) काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पत्रकार परिषद घेणार हे कळल्यानंतर ते काय बोलणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. यावेळी ते म्हणाले की, “आता माझी अडचण होणार नाही, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शब्द दिला आहे.” असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला. तसेच, माझा पूर्ण पाठींबा हा भाजपला असणार असल्याचेदेखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. (Eknath Shinde press conference about mahayuti and chief minister post)

हेही वाचा : Raj Thackeray : भाजपला विधानसभेला एवढं मोठं यश कसं मिळालं? राज ठाकरेंच्या शिलेदाराचा खळबळजनक दावा 

- Advertisement -

“मी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या बोलणे केले. त्यावेळी त्यांना स्पष्टपणे सांगितले की, तुम्ही जो काही निर्णय घ्याल, ज्याला मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनवाल तो मला आणि शिवसनेनेला मान्य असेल.” असे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. “महायुतीला जे यश मिळाले, तो विजय अविश्वसनीय आहे. महायुतीने केलेल्या कामाची ही पोचपावती आहे. हा सर्व जनतेचा विजय आहे. या निवडणुकीमध्ये महायुतीच्या सर्वच नेत्यांनी काम केले आहे. मीही पायाला भिंगरी लावून एका सध्या कार्यकर्त्याना म्हणून काम करतो, मी मुख्यमंत्री स्वतः ला कधीच समजलो नाही. मी स्वतः ला एक सर्वसामान्य कार्यकर्त्याप्रमाणेच राहत होते. मी अडीच वर्षाच्या काळात मी जे काही काम केले, त्यामध्ये मी समाधानी आहे. महायुतीमध्ये भाजपनेही मला चांगले सहकार्य केले. त्यामुळे पंतप्रधान मोदी, अमीत शहा यांना धन्यवाद देईल. त्यांच्या सहकार्यामुळे राज्याचा विकासदेखील चांगला झाला. गेल्या अडीच वर्षात अनेकांचे प्रश्न सोडवले. मग ते शेतकरी असो, बेरोजगार असो, किंवा सर्वसामान्य असो.” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

आम्ही रडणारे नाही तर लढणारे : एकनाथ शिंदे

“महाविकास आघाडीचे सरकार असताना ज्या योजनांना ब्रेक लागला. त्या कामांना आम्ही गती आणली. त्यामुळे मागे पडलेला आपला महाराष्ट्र हा एक नंबरवर पोहोचला. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत राज्यात महाराष्ट्रने महायुतीला भरभरून प्रतिसाद दिला.” असे म्हणत त्यांनी महाराष्ट्रीतील जनतेचे आभार मानले. “महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक सवाल उपस्थित करण्यात येत होते, की एकनाथ शिंदे नाराज आहेत वगैरे, पण असे काही नाही. आम्ही रडणारे नाही तर लढणारे आहोत. मी काल आधी अमित शहा त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर बोलणे झाले. त्यावेळी त्यांना स्पष्टपणे सांगितले की, मुख्यमंत्रिपदाबाबत जो काही निर्णय घ्याल तो आम्हाला शिवसेना पक्षाला मान्य असेल,” असे स्पष्ट करत त्यांनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला. दरम्यान, काळजीवाहू मुख्यमंत्री असताना त्यांनी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर पत्रकार परिषद घेणे अपेक्षित होते. पण त्याऐवजी ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद घेण्यात आली. तसेच, दुपारी 3 वाजताची पत्रकार परिषद ही अंदाजे 4 वाजता सुरू झाली. यावेळी शिवसेनेचे नेते संजय शिरसाट, दादा भुसे, रवींद्र फाटक, प्रताप सरनाईक, यांच्यासह अनेक आमदार उपस्थित होते.


Edited by Abhijeet Jadhav

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -