‘शाह माझ्या पाठीशी ‘चट्टान’सारखे उभे राहिले’, मुख्यमंत्री शिंदेंनी केली अमित शाहांची तोंडभरून स्तुती

शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण मिळवण्यापर्यंतच्या या संघर्षात शिंदे गटाला भाजपची साथ मिळाली, त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार व्यक्त केले.

Eknath-Shinde-on-Amit-Shah

शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व शिवसैनिकांना धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात आपण सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. दुसरीकडे शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटाचे कार्यकर्ते याचा आनंदोत्सव साजरा करत आहे. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण मिळवण्यापर्यंतच्या या संघर्षात शिंदे गटाला भाजपची साथ मिळाली, त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार व्यक्त केले. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण मिळवण्यापर्यंतच्या प्रवासाचा उलगडा स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय.

शिवसेनेतील आमदारांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात भाजपच्या पाठिंब्याचे सरकार स्थापन केल्याबाबत एक वक्तव्य केलंय. अमित शाहा यांच्या उपस्थितीत त्यांचे आभार व्यक्त करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “अमित शाहाजींनी मला सांगितले, शिंदे जी तुम्ही पुढे व्हा. आम्ही तुमच्या मागे पहाडासारखे उभे राहू. शाहाजींनी जे सांगितले ते केले.”

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजकीय प्रवासाचा आढावा घेणाऱ्या ‘मोदी @ 20’ या पुस्तकाच्या मराठी अवृत्तीचं प्रकाशन देशाचे गृहमंत्री अमित शाहा यांच्या हस्ते करण्यात आलं. पुण्यात आयोजित प्रकाशन सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना एकनाथ शिंदेंनी हे वक्तव्य केलंय. या कार्यक्रमामध्ये फडणवीस आणि शिंदे यांच्या भाषणानंतर अमित शाहांनी भाषण केलं. केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी दिलेल्या निर्णयाबद्दल अमित शाहांनी भाष्य केलं. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण खऱ्या शिवसेनेला मिळालं याबद्दल त्यांचं टाळ्या वाजवून अभिनंदन करा,” असंही शाहा म्हणाले. ” निवडणूक आयोगाने दूध का दूध, पानी का पानी केलं आहे, असं देखील अमित शाहा म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला खरी शिवसेना आणि धनुष्यबाण दोन्ही मिळाल्याचे ते म्हणाले.