हुश्श… एकनाथ शिंदे गुवाहाटीमध्येच, एक तासानंतर हॉटेलमध्ये परतले

Eknath Shinde's new tweet after his name for the post of Chief Minister was announced

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे ४२ आमदारांना घेऊन गेल्या काही दिवसांपासून आसाममधील गुवाहाटीतील हॉटेलात मुक्काम ठोकून आहेत. नुकतीच त्यांनी या आमदारांबरोबर बैठक घेऊन पुढील रणनितीही आखली. पण त्यानंतर शिंदे काही आमदारांसह redisan blue हॉटेल बाहेर जाताना दिसले. मात्र ते कुठे गेले याबद्दल कोणालाच काही माहित नव्हते. यामुळे ते मुंबईला गेले असल्याची चर्चा सुरू झाली. पण एक तासानंतर शिंदे पुन्हा हॉटेलमध्ये परतले . यामुळे शिंदे मुंबई, दिल्लीकडे न जाता गुवाहाटीतच आहेत हे बघून आमदारांनीही हुश्श केलं.

प्रामुख्याने गुवाहटीतील हॉटेलमध्ये मुक्कामी असलेले शिंदे महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक बंडखोर आमदाराचे जातीने स्वागत करत आहेत. आमदारांचे मनोबल वाढवण्यासाठी ते सतत आमदारांबरोबर संवाद साधत आहेत. पण दिलीप लांडे जेव्हा मुंबईहून गुवाहटीमधील रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये पोहचले तेव्हा तिथे शिंदे कुठेही दिसले नाही. यामुळे शिंदे कुठे गेले असा प्रश्न सगळ्यांनाच पडला. गुवाहटीमध्ये शिवसेनेशी संबंधित कोणीच नाही. मग अशावेळी शिंदे आमदारांना घेऊन कोणाला भेटायला गेले असावे असा प्रश्न चर्चिला जात होता. यादरम्यान, मुंबई आणि दिल्लीतही बऱ्याच राजकीय घडामोडी घडत असल्याने शिंदे मुंबईकडे रवाना झाल्याच्या चर्चांना उधाण आले. पण एक तासानंतर शिंदे हॉटेलकडे परतले.