Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रEknath Shinde : भाजपच्या 'त्या' ऑफर्सवर शिंदेंनी टाकली गुगली, वरिष्ठ नेतृत्त्व पेचात;...

Eknath Shinde : भाजपच्या ‘त्या’ ऑफर्सवर शिंदेंनी टाकली गुगली, वरिष्ठ नेतृत्त्व पेचात; कसा मार्ग काढणार?

Subscribe

Eknath Shinde Vs Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू आहे. यातच भाजपनं शिंदेंसमोर दोन पर्याय ठेवले होते. पण...

विधानसभा निवडणूक झाली आणि महायुतीला जनतेनं स्पष्ट बहुमत दिलं. मात्र, बहुमत मिळाल्यानंतरही सरकार स्थापनेस वेळ होत आहे, त्याचं कारण म्हणजे मुख्यमंत्रिपद. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. ते सध्या ‘काळजी’वाहू मुख्यमंत्री आहेत. शिंदेंनी पुन्हा मुख्यमंत्री करावे, अशी अट केंद्रातील भाजपच्या वरिष्ठांकडे केली आहे. मात्र, यास केंद्रानं स्पष्ट नकार दिला असून शिंदेंसमोर दोन ऑफर ठेवल्या होत्या. या ऑफर धुडकावत शिंदेंनी गुगली टाकली आहे.

भाजपनं एकनाथ शिंदे यांच्यासमोर केंद्रासह राज्यातील एका मंत्रिपदाची ऑफर दिली आहे. परंतु, एकनाथ शिंदे यांनी श्रीकांत शिंदे यांचं नाव भाजपच्या समोर ठेवलं आहे. यावर भाजपकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही.

- Advertisement -

हेही वाचा : “बारामती लढली नसती, तर वेगळा संदेश गेला असता”, शरद पवारांच्या विधानावर अजितदादा म्हणाले, “माझ्या भावाच्या…”

एका इंग्रजी वृत्तपत्राला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपनं एकनाथ शिंदे यांना केंद्रात मोठं मंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. मात्र, शिंदेंनी ही ऑफर धुडकावून लावली आहे.

- Advertisement -

माझ्या नेतृत्त्वाखाली विधानसभा निवडणूक लढवली आहे. त्यामुळे मला मुख्यमंत्री बनवत नसाल तर महायुतीचं संयोजक पद देण्यात यावे. त्यासह कल्याण-डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे यांना देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री बनवण्यात यावे, अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्त्वाकडे करून गुगली टाकली आहे.

एकनाथ शिंदेंनी केलेल्या मागणीवर भाजपकडून सकारात्मक प्रतिसाद आला नाही. त्यामुळेच महायुती सरकारच्या शपथविधीला उशीर होत असल्याचं बोललं जात आहे.

हेही वाचा : “10 मिनिटांत यांना आमदार केलं, मात्र आता फडणवीसांचा हा पठ्ठ्या…”, राम सातपुतेंचा रणजितदादांना इशारा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -