Homeमहाराष्ट्रEknath Shinde : स्वतः घरात बसू पण दुसऱ्याला म्हणू रुसू बाई रुसू,...

Eknath Shinde : स्वतः घरात बसू पण दुसऱ्याला म्हणू रुसू बाई रुसू, ठाकरेंच्या टिकेला शिंदेंकडून प्रत्युत्तर

Subscribe

माझ्यातला कार्यकर्ता खुर्ची शोधत नाही, तर तो काम शोधतो, सतत कार्यरत राहणे हेच माझे ध्येय असून रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत सर्वसामान्य माणसासाठी काम करत राहणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. जालना येथील आझाद मैदानावर पार पडलेल्या विराट आशा आभार सभेला संबोधित करताना त्यांनी हे मत व्यक्त केले. तसेच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेचाही समाचार घेतला.

जालना : माझ्यातला कार्यकर्ता खुर्ची शोधत नाही, तर तो काम शोधतो, सतत कार्यरत राहणे हेच माझे ध्येय असून रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत सर्वसामान्य माणसासाठी काम करत राहणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. जालना येथील आझाद मैदानावर पार पडलेल्या विराट आशा आभार सभेला संबोधित करताना त्यांनी हे मत व्यक्त केले. यावेळी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला भरभरून मतदान केल्याबद्दल त्यांनी जनतेचे जाहीर आभार मानले. तसेच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेचाही समाचार घेतला. (Eknath Shinde response to Uddhav Thackeray Rusu Bai Rusu criticism)

यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, निवडणुकीच्या आधी प्रचारासाठी इथे आलो असता महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन जनतेला केले होते, त्यानुसार या भागातील महायुतीचे पाचही उमेदवार निवडून आले. त्यावेळी मी शब्द दिला होता की, जिंकलो तर विजयाचा गुलाल खेळण्यासाठी पुन्हा इथे येईन, त्यानुसार आज इथे तुम्हाला धन्यवाद द्यायला आणि तुमचे आभार मानायला इथे आलो आहे. लोकसभा निवडणुकीनंतर पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत झालेला विजय आज आपण दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी अर्पण करतो. या निवडणुकीत शिवसेनेला घवघवीत यश मिळवून दिल्याबद्दल लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ, लाडक्या तरुणांचे आणि जालना शहरातील लाडक्या मतदारांचेही शिंदेंनी आभार मानले.

हेही वाचा – Uddhav Thackeray : स्वकीयांकडून भारतमातेला पुन्हा साखळदंडात जखडण्याचा प्रयत्न, ठाकरेंची घणाघाती टीका

मुंबई आणि ठाण्यानंतर या मराठवाड्यावर दिवंगत बाळासाहेबांनी भरभरून प्रेम केलं आणि इथल्या जनतेनेही बाळासाहेबांवर भरभरून प्रेम केले. मराठवाडा हा शिवसेनेचा अभेद्य गड आहे आणि यापुढेही कायम राहणार आहे. या जालन्यातून शिवसेनेच्या दोन तर महायुतीच्या पाचही जागा निवडून आल्या, यालाच ‘जालन्याचा जलवा’ म्हणतात. जालन्यातील जनतेने भरभरून प्रेम केल्याने अर्जुन खाेतकर चक्रव्ह्यूह भेदण्यात यशस्वी ठरले. तर हिकमत उढाण यांचे उडान कुणी रोखू शकले नाही. हे दोघे शिवसेनेचे संताजी आणि धनाजी आहेत. हिकमत उढाण आणि अर्जुन खोतकर हे करण-अर्जुनसारखी जोडी आहेत. ही जोडी जालन्याच्या विकासात कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही शिंदेंनी यावेळी दिली.

स्वतः घरात बसू पण दुसऱ्याला म्हणू रुसू बाई रुसू

दरम्यान, उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना एकनाथ शिंदे म्हणाले की, काही जण पराभूत होऊनही सुधरत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह माझ्यावर टीका करतात. स्वतःला अमित शाह यांच्या नखाचीही सर नसूनही वाघनखे काढण्याची भाषा करतात. परवा माझ्यावर रुसू बाई रुसू म्हणत टीका केली म्हणजे स्वतः घरात बसायचे आणि दुसऱ्याला म्हणायचे रुसू बाई रुसू, असे म्हणत शिंदेंनी ठाकरेंच्या टीकेचा समाचार घेतला. दरम्यान, यावेळी जालना-परतूरचे उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख आसाराम बोऱ्हाडे आणि जालना महानगरपालिकेच्या काँग्रेस पक्षाच्या आठ नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.

हेही वाचा – VHP : हिंदू समाजाने तीन मुले जन्माला घालावी, विश्व हिंदू परिषदेच्या बैठकीत निर्णय