Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र ती राष्ट्रीय महाशक्ती कोणती?, एकनाथ शिंदेंचा खुलासा

ती राष्ट्रीय महाशक्ती कोणती?, एकनाथ शिंदेंचा खुलासा

Subscribe

शरद पवारांनी दिलेल्या धमकीवजा इशाऱ्यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, शरद पवार मोठे नेते आहेत. त्यांचा आम्ही आदर केला आहे. शेवटी लोकशाहीत नंबर महत्त्वाचे असतात. कायद्याप्रमाणे जे काही नियमाप्रमाणे आहे तेच करावे लागतात. घटनेप्रमाणे आमची बाजू भक्कम आहे

शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यानंतर आता बंडखोर शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी एक महत्वाचं विधान केलं आहे. आमदारांच्या बैठक झाली. त्यानंतर पुढची रणनिती ठरवण्यात येईल. आता बहुमताचा जो आकडा लागतो तो पूर्ण झाला आहे. त्यापेक्षा जास्त आमदारांची संख्या झाली आहे. त्या बरोबर अपक्ष आमदार आमच्यासोबत आहेत. त्यामुळे सगळ्या आणि तांत्रिक बाबी पूर्ण झाल्या आहेत.सत्ता स्थापनेसाठी किंवा पाठिंबा काढण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. परंतु बैठक होईल त्यानंतर पुढची रणनिती ठरणार आहे. असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

दरम्यान एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीच्या रेडिनस ब्लू हॉटेलमध्ये आमदारांना संबोधित करतानाचा एक व्हडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये शिंदेंनी एक महाशक्ती आपल्या पाठीशी असल्याचा दावा केला होता. ही महाशक्ती नेमकी कोणती? असा प्रश्न शिदेंना विचारण्यात आला असता बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे हे महाशक्ती आमच्या पाठिशी असून त्यांचे आमच्या पाठीशी आशीर्वाद आहेत. असं एकनाथ शिंदे म्हणाले आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

बंडखोर आमदारांना निलंबित करण्याचे अधिकार नाही

- Advertisement -

बंडखोर आमदारांना निलंबित करण्याचे अधिकार नाही. कारण अल्पमतात जे लोकं आहेत. त्यांना निलंबन करण्याचा अधिकार नाही. कारण बहुमत असल्यामुळे तसेच मिटींगला आले नाही म्हणून जर निलंबन होत असेल तर हे देशातील पहिले उदाहरण ठरेल. जो अधिकार नाही तो अधिकार राबवता येणार नाही. या देशात राज्यघटना आहे. नियम आहे त्याप्रमाणे चालावे लागेल. कोणाला वाटतं तसं वागता येणार नाही. अशा इशाराही एकनाथ शिंदे यांनी दिला.

बंडखोर शिवसेना आमदारांना निलंबित करु शकत नाहीत कारण त्यांना तसा अधिकार नाही, इथे ३७ आमदारांचा जो गट आहे तोच महत्त्वाचा गट आहे. सुनील प्रभू यांनी विधानसभा उपाध्यक्षांना जे पत्र पाठवलं आहे. सुनील प्रभूंना तसा अधिकार नाही. कारण ते आता अल्पमतात आहेत. असही शिंदे म्हणाले. खरी शिवसेना आमची असा कोणताही दावा आम्ही केला नाही. आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहेत. बहुमत आमच्याकडे आहे. बैठक झाल्यावर आणखी काही गोष्टी स्पष्ट होतील. असही शिंदे म्हणाले.

शरद पवारांच्या विधानावर उत्तर

- Advertisement -

शरद पवारांनी दिलेल्या धमकीवजा इशाऱ्यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, शरद पवार मोठे नेते आहेत. त्यांचा आम्ही आदर केला आहे. शेवटी लोकशाहीत नंबर महत्त्वाचे असतात. कायद्याप्रमाणे जे काही नियमाप्रमाणे आहे तेच करावे लागतात. घटनेप्रमाणे आमची बाजू भक्कम आहे.


आसाममधील पूराचे भीषण संकट काही थांबेना; आत्तापर्यंत १०८ मृत्यू, ३० जिल्हे प्रभावित

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -