Live Update : शहापूरमध्ये पुराच्या पाण्यात पाचजण वाहून गेले

corona update maharashtra political crisis cm eknath shinde shivsena atal bihar vajpayee death aniversary

शहापूरमध्ये पुराच्या पाण्यात पाचजण वाहून गेले


पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली


ग्लोबल अॅवॉर्ड प्राप्त झालेले गुरुजी रणजितसिंह डिसले यांचा राजीनामा


माजी नगरसेविका शितल म्हात्रेही शिंदे गटात सामिल होणार


उद्धव ठाकरेंचे रागवण्याचे दिवस राहिलेत का? – नारायण राणे


सर्वांचा मान ठेवून द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार, उद्धव ठाकरेंनी जाहीर केली भूमिका


मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती


५० आमदारांचा द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा, एकनाथ शिंदेंची माहिती


शिवसेना आमदार संतोष आमदार यांचे मुंबईत शक्तीप्रदर्शन


ओबीसी राजकीय आरक्षणावर बुधवारी सुनावणी होणार

निवडणुकीमध्ये ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला अशांची प्रक्रिया थांबवता येणार नाही- सुप्रीम कोर्ट

उद्यापासून सुरू होणाऱ्या नामांकन प्रक्रीयेवर एक आठवड्याची स्थगिती

राज्य निवडणूक आयोग यथास्थिती सांगू न शकल्यामुळे त्यामुळे याचिका पास ओवर करण्यात आली आहे


राष्ट्रवादीचे नेते जिंतेंद्र आव्हाड मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला


शिवसेनेच्या माजी आमदारांची शिवसेना भवनात बैठक

हिंगोलीतील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार

उद्धव ठाकरे २ वाजता शिवसेना भवनात दाखल होणार


मनसेचा उद्याचा मेळावा पुढे ढकलला; राज ठाकरेंची घोषणा


राष्ट्रपती निवडणुकीत द्रोपद्री मुर्मू यांना शिवसेनेचा पाठिंबा शिवसेनेच्या खासदारांच्या बैठकीत निर्णय


मुंबईकरांना महापालिकेचा सावधानतेचा इशारा

गरज असल्यास घराबाहेर पडण्याचा नागरिकांना सल्ला

मुसळधार पावसामुळे समुद्र किनारी जाण्याचे आवाहन


पुण्यात घराची भिंत कोसळून दोन जण गंभीर जखमी


 

मेडीगट्टा लक्ष्मी धरणाचे 81 दरवाजे सुरू

सहा लाख 60 हजार 580 क्युसेक पाण्याचा विसर्ग.

महाराष्ट्र तेलंगणा राज्यातील सीमावर्ती भागात असलेल्या मेडीगट्टा लक्ष्मी धरणाचे 81 दरवाजे सुरू.

या धरणातून 6 लाख 60 हजार 580 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.

सध्या सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि या धरणातून पाणी सोडल्याने गोदावरी व प्राणहिता चा नद्यांची पातळी वाढलेली आहे.

गडचिरोली जिल्ह्यात सतत चार दिवसांपासून मुसळधार पावसाच्या फटका अनेक नाल्या नाही बसलेला आहे.


गडचिरोली जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरूच

या मुसळधार पावसाच्या फटका अनेक नदी-नाल्यांना बसलेला आहे

नागेपल्ली येथील एफडीसीएम कालनी मध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे एफडीसीएम कालनीच्या चार ते पाच घरात पाणी शिरले

सध्या जिल्हा मुख्यालय रिमझिम पाऊस सुरु आहे


मुंबईसाठी पुढील २ दिवस सतर्कतेचे

मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रासाठी अतिवृष्टीचा इशारा