घरताज्या घडामोडीमी कधीही पदासाठी लालसा केली नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मी कधीही पदासाठी लालसा केली नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Subscribe

मी १९९७ ला नगरसेवक झालो. त्यापूर्वी देखील मी पाच वर्ष होऊ शकलो असतो. परंतु दिगंबर धोत्रे नावाचे भाजपचे कार्यकर्ते होते. युतीमध्ये त्यांना तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर धर्मवीर आनंद दिघे साहेब बोलले की, युतीचं काय करायचं ते बघून घेऊ. पण तुला तिकीट देणार, असं दिघे म्हणाले. त्यानंतर मी साहेबांना सांगितलं की, साहेब युती तोडू नका मी पाच वर्षानंतर नगरसेवक होईन. ही वस्तुस्थिती आहे, मी कधीही पदासाठी लालसा केली नाही, मला आयुष्यात पुढे जायचंय, त्यामुळे मी पदाची लालसा कधीच केली नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

विधीमंडळाचं विशेष अधिवेशन सुरू आहे. यावेळी सभागृहात एकनाथ शिंदे यांनी बोलताना आपल्याला कोणत्याही पदाची लालसा नाही, अशा प्रकारचं वक्तव्य केलं आहे. मी शाखाप्रमुखांपासून १९९७ ला नगरसेवक झालो. त्यानंतर मी काम केलं. तसेच मी कधीही मागे वळून पाहिलं नाही. मी कधीही कुटुंबाचा विचार केला नाही. यावेळ आमचे बाप काढले, कुणी रेडा, कुणी प्रेत तर कुणी पोस्टमॉर्टम म्हणाले. ४० लोकांचे बळी द्यायचे. आमच्यासोबत महिला आमदार होत्या. त्यामुळे त्यांना वेश्या म्हणायचं. आपण कुठल्या थराला चाल्लोय, तरीदेखील आम्ही एकही शब्द काढला नाही. मी शांत स्वभावाचा आहे, पण जेव्हा अन्याय होतो. त्यावेळेस मला शांत राहता येत नाही. माझं काम दीपक केसरकरांनी हलकं केलं, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

आमचे बाप काढले असले तरी देखील मी तुम्हाला सांगतो की, माझे वडील जिवंत आहेत. माझी आई गेली. त्यावेळी मी गावी होतो, मला शिवसेना पक्षप्रुमख उद्धव ठाकरे यांनी फोन केला होता. तेव्हा आईने फोन घेतला आणि उद्धव ठाकरेंना सांगितलं की, माझ्या बाळाला सांभाळा. माझे वडील खूप कष्ट करून पुढे आलेत. कष्ट करून त्यांनी मला इथपर्यंत आणलं आहे. त्यांचे आशीर्वाद मला आहेत, असं शिंदे म्हणाले.

जेव्हा मी घरी जायचो, तेव्हा माझे आई-वडील झोपलेले असायचे. परंतु मी जेव्हा उठायचो तेव्हा ते कामाला जायचे. आम्ही पंधरा दिवसातून कधीतरी भेटायचो. हीच परिस्थिती माझा मुलगा श्रीकांत शिंदेंसोबत झाली. श्रीकांत शिंदे डॉक्टर झाले. परंतु मी त्यांना वेळ देऊ शकलो नाही. मी रात्री यायचो आणि तो सकाळी जायचा. यावेळी देखील मी बाप म्हणून कधीही त्याला वेळ देऊ शकलो नाही. कारण मी संघटना आणि शिवसेनेला वेळ दिला. तसेच मी शिवसेनेला कुटुंब मानलं, असं शिंदे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी जितेंद्र आव्हाडांचे


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -