Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र एकनाथ शिंदेगटाची गोची , कायद्याची गुंतागुंत, विलीनीकरणाशिवाय पर्याय नाही

एकनाथ शिंदेगटाची गोची , कायद्याची गुंतागुंत, विलीनीकरणाशिवाय पर्याय नाही

Subscribe

कायदेशीर गुंतागुत वाढतच असल्याने शिंदे यांच्यापुढे आता दुसऱ्या पक्षात विलीनीकरणाशिवाय पर्यायच उरलेला नाही.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्रातील राजकारण पेटले असून त्यांच्या विरोधात राज्यभरात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. तर उद्धव ठाकरेंविरोधात बंड पुकारून शिंदेगटाला सहा दिवस उलटले . मात्र याप्रकरणात कायदेशीर गुंतागुत वाढतच असल्याने शिंदे यांच्यापुढे आता दुसऱ्या पक्षात विलीनीकरणाशिवाय पर्यायच उरलेला नाही. यामुळे ‘आसमान से गिरे और खजूर पे’ अटके अशी अवस्था शिंदेगटाची झाली आहे.

शिंदे ४० बंडखोर आमदारांसह गुवाहटीतील हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत यास सहा दिवस उलटले आहेत . मात्र या सहा दिवसात शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात आरोप प्रत्यारोप, घोषणाबाजी आणि भावनिक साद याव्यतिरिक्त फार काही राजकीय हालचाली झालेल्या नाहीत. शिंदे यांनी स्वतंत्र शिवसेना बाळासाहेब गटाची घोषणा केली. मात्र त्यास ठाकरे कुटुंबीय आणि राज्यभरातून विरोध होत असून बाळासाहेबांचे नाव वापरून राजकारण करत असल्याचा आऱोप शिंदेगटावर करण्यात येत आहे.  शिंदे यांचे शिवसेनेत माघारी येण्याचे परतीचे दोरही कापले गेले आहेत.  यामुळे राज्यातील राजकीय संघर्ष अधिकच चिघळला असून शिंदेगटा विरोधात राज्यभरात वातावरण निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे शिंदेगट यापुढे काय करणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहीले आहे. पण पक्षांतरविरोधी कायद्यातील गुंतागुतीमुळे शिंदे यांना निर्णय घेण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे.

- Advertisement -

यामुळे आपल्याकडे शिवसेनेच्या दोन तृतीयांश आमदारांचा पाठींबा असल्याचा दावा करणारे शिंदे यांना कायद्याचे फार ज्ञान नसावे अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत. कायदेतज्ञांच्या मते पक्षांतर कायदा विभाजन ओळखत नाही, दोन तृतीयांश आमदारांना घेऊन शिंदे यांना वेगळा गट स्थापन करता येणार नाही. त्यापेक्षा त्यांना दुसऱ्या नोंदणीकृत गटात विलीनीकरण करावे लागणार आहे. त्यांनी तसे न केल्यास ते अपात्र ठरतील. सध्या शिंदेगटात सामील झालेले आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेत किंवा भाजपमध्ये शिंदेगटाला विलनीकरण करावे लागणार आहे. याव्यतिरिक्त त्यांच्याकडे पर्याय नसल्याचे कायदेपंडितांचे म्हणणे आहे.

दरम्यान शिंदे गटाचा हॉटेलमधला एक व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आहे. त्यात शिंदे आमदारांना आपल्यासोबत महाशक्ती असल्याचे सांगत असल्याचे दिसत आहे. ही महाशक्ती भाजपच असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. यामुळे येत्या काही तासात किंवा दिवसात शिंदेगट भाजपमध्येच सामील होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

 

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -