Maharashtra Assembly Election 2024
घरताज्या घडामोडीEknath Shinde : 'ते तुम्हीच ठरवा...', अमित शहांच्या भेटीत नाराज, व्हायरल फोटोवर...

Eknath Shinde : ‘ते तुम्हीच ठरवा…’, अमित शहांच्या भेटीत नाराज, व्हायरल फोटोवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

Subscribe

विधानसभा निवडणुकीचा निकाल महायुतीच्या बाजुने लागला असून जवळापास 230 जागांवर महायुतीने विजय मिळवला आहे. मात्र आठवडा संपत आला तरी, अद्याप सरकार स्थापन झाले नाही. त्यामुळे महायुतीत सारं काही आलबेल आहे का? असा सवाल उपस्थित होतो आहे. शिवाय, राज्यातील महायुतीच्या प्रमुखांनी गुरूवारी (27 नोव्हेंबर) दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर व्हायरल झालेल्या फोटोवरून सध्या राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल महायुतीच्या बाजुने लागला असून जवळापास 230 जागांवर महायुतीने विजय मिळवला आहे. मात्र आठवडा संपत आला तरी, अद्याप सरकार स्थापन झाले नाही. त्यामुळे महायुतीत सारं काही आलबेल आहे का? असा सवाल उपस्थित होतो आहे. शिवाय, राज्यातील महायुतीच्या प्रमुखांनी गुरूवारी (27 नोव्हेंबर) दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर व्हायरल झालेल्या फोटोवरून सध्या राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. या फोटोत राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर वेगळाच भाव पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याचे केंद्रीय निर्णयावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. पंरतू, त्या व्हायरल फोटोवर आणि नाराजीवर एकनात शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Eknath Shinde talk on the photo going viral during amit shah meet in delhi)

महाराष्ट्रातील सरकार स्थापनेबाबत महायुतीच्या प्रमुखांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली. त्यावेळी भाजप नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार हे आनंदी असल्याचे पाहायला मिळाले. पण राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर वेगळाच भाव पाहायला मिळाला. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याचे बोलले जात होते. परंतू त्यावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यानुसार, “आता माझा चेहरा कधी गंभीर, कधी हसरा असतो हे तुम्ही ठरवता, ते तुम्हीच ठरवा. मी आजही खूश आहे. कारण गेली दोन अडीच वर्षे आम्ही जे काम केलं, लाडकी बहीणसारख्या ज्या कल्याणकारी योजना आणल्या त्याचा चांगला रिझल्ट आम्हाला या निवडणुकीत पाहायला मिळाला. राज्यातील निवडणुकांच्या आतापर्यंतच्या इतिहासात कधीही एवढं मोठं बहुमत मिळालं नव्हतं. याचा अर्थ सरकरावर जनता खूश आहे आणि सरकारच्या कामावर जनता समाधानी आहे. यातच आमचं समाधान आहे”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान, राज्यातील सरकार स्थापनेपूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला समोर आला आहे. त्यानुसार 22-12-10 याप्रमाणे मंत्रिपदाचे वाटप होणार असल्याचे बोलले जात आहे. विधानसभेच्या निकालात सर्वाधिक 132 जागांवर भाजपने विजय मिळवल्याने मुख्यमंत्री भाजपचाच होणार असून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार असल्याते सांगितले जात आहे. शिवाय 21 ते 22 मंत्रिपद भाजपला मिळणार असल्याचे समजते. त्यामुळे 12 मंत्रिपद ही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला येणार असून 10 मंत्रिपद ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला येणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहेत.


हेही वाचा – Bharat Gogawale : आम्ही महायुतीत पण, प्रत्येकानं वेगळं लढायची तयारी ठेवावी; असं का म्हणाले गोगावले?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -