माझ्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार, माझाच गट अधिकृत – एकनाथ शिंदे

याच पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाची दुपारी १ वाजता महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत महाविकास आघाडी राहणार की कोसळणार यावर चर्चा सविस्तर चर्चा होणार आहे.

eknath shinde to arrive in mumbai on special flight to meet governor shocks thackeray govt

महाराष्ट्रातील राजकीय पेच आता गुजरातमधून आसाममध्ये पोहचला आहे. बंडखोर शिवसेना नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार सुरतहून विशेष विमानाने पोहचले आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदार असल्याने ते स्वतंत्र्य गट स्थापन करण्याची शक्यता निर्माण झाली. एकनाथ शिंदे यांनीही माझ्यासोबत ४० आमदार असून हा शिवसेनाचा अधिकृत गट असल्याचा दाव केला आहे. यामुळे शिंदे त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांचे पत्र आज राजभवनात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

यानंतर सरकार अल्पमतात असल्याचे सांगून लवकरच विश्वासदर्शक ठराव सिद्ध करण्याचे आदेश राज्यपाल देण्याची शक्यता आहे. शिंदे यांच्या सोबतच्या ४० आमदारांच्या गटाला राज्यपालांकडून स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळल्यास सरकार पडणार हे निश्चित आहे.

एकनाथ शिंदे स्वतंत्र गटाच्या अधिकृत मान्यतेसाठी दुपारी मुंबईत दाखल होत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. गुवाहाटीवरुन शिंदेंसाठी एका विशेष विमानाची सोय करण्यात आली असून त्या विमानाने शिंदे मुंबईत येणार असल्याची माहिती आहे. यावेळी शिंदेंसोबत २ ते ३ आमदार उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

आत्तापर्यंत सत्तास्थापनेच्या संख्याबळाचं गणित कसं जुळत याकडे सर्वांच लक्ष होत. यात दोन तृतीआंश आमदारांपेक्षा जास्त आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणं गरजेचं होतं. यात शिंदेंना ३७ चा आकडा गाठयचा होता, दरम्यान माझ्यासोबत शिवसेनेच्या ५५ आमदारांपैकी दोन तृतीयंश आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केल्याने आता त्या गटाला स्वंतत्र्य गट म्हणून अधिकृत दर्जा मिळणार हे निश्चित आहे. त्यामुळे भाजपसोबत सत्तास्थापनेसाठी दावा शिंदे करतील अशी शक्यता आहे.

याच पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाची दुपारी १ वाजता महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत महाविकास आघाडी राहणार की कोसळणार यावर चर्चा सविस्तर चर्चा होणार आहे.


बाळासाहेबांचं हिंदुत्व पुढे नेणार, माझ्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार – एकनाथ शिंदे