देशातच नव्हे तर परदेशातही एकनाथ शिंदेंचीच चर्चा, गुगलच्या ट्रेंड सर्चमध्ये टॉपवर

eknath shinde

शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  यांच्या बंडामुळे राज्यासह देशातील राजकीय परिस्थिती ढवळून निघाली आहे. परंतु ही राजकीय परिस्थिती आता राज्य आणि देशातच नव्हे तर परदेशातही दिसून आली आहे. पाकिस्तान, थायलंड, जपान आणि इतर देशांत सुद्धा एकनाथ शिंदे यांचीच चर्चा सुरू आहे. तसेच गुगलच्या टेंड्र सर्चमध्ये एकनाथ शिंदे हेच टॉपवर आहेत. एकनाथ शिंदे नेमके कोण आहेत, याबाबतची उत्सुकता पाकच्या नागरिकांमधून पहायला मिळत आहे.

पाकिस्तानमधील ५० टक्क्यांपेक्षा अधिक लोकं एकनाथ शिंदे यांच्याविषयी माहिती शोधत असल्याचं समजत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील राजकीय वादळाची चर्चा देशातच नाही तर जगभरात देखील मोठ्या प्रमाणात होत आहेत. जवळपास ३३ देशांमध्ये तीन दिवसांत पाच नेत्यांविषयी अधिक माहिती सर्च करण्यात आली आहे. पाकिस्तानचा सर्च करण्यामध्ये प्रथम क्रमांक लागतो. तर एकनाथ शिंदे ५४ टक्के, उद्धव ठाकरे ४४ टक्के, शरद पवार १
टक्के, देवेंद्र फडणवीस १ टक्के, अजित पवार १ टक्के इतक्या प्रमाणात परदेशातील नागरिकांकडून सर्च केलं जात आहे.

पाकिस्तानसोबतच सौदी अरेबिया, मलेशिया, नेपाळ, बांगलादेश, थायलंड, जपान आणि कॅनडा या देशात एकनाथ शिंदेंच्या नावाने गुगल सर्च करण्यात आल्याचं कळत आहे. एकनाथ शिंदेंच्या गटात सामील झालेल्या बंडखोर आमदारांवर त्या-त्या मंत्र्यांच्या मतदारसंघातून पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

जवळपास ३७ आमदार आणि ८ अपक्ष आमदार असे एकूण ४६ आमदार शिंदेगटात सामील झाले आहेत. काल गुवाहाटीत शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. परंतु १२ आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशा प्रकारचं पत्र विधानसभचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना पाठवले आहे. तर दुसरीकडे संपूर्ण आमदारांचा पाठिंबा असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसह शिंदे गटाची पुढची भूमिका काय असेल, हे पाहणं महत्त्वाचं आहे.


हेही वाचा : उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये, जिल्हाप्रमुखांच्या बोलावल्या बैठका