आमदार महेंद्र दळवींचा व्हिडीओ एकनाथ शिंदेंनी केला ट्विट, म्हणाले…

mahendra dalvi

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत गुवाहाटी येथे आपल्या सोबत नाराज आमदारांना ठेवले आहेत. या गटाचील सुमारे 20 आमदार आमच्या संपर्कात असल्याचे संजय राऊत म्हणाले होते. तर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सुमारे 15 आमदार आमच्या संपर्कात असल्याचे म्हंटले होते. या संपर्कातील आमदारांमध्ये महेद्र दळवी शिवसेना नेत्यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात होते. यावर एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी महेद्र दळवी यांचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

काय आहे ट्विटमध्ये – 

या ट्विट मध्ये व्हिडीओ सोबत त्यांनी #रायगड जिल्हा #अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार श्री.महेंद्र दळवी यांचे स्पष्टीकरण खालील प्रमाणे… एकनाथ शिंदेंनी जो हिंदुत्वाचा निर्णय घेतला आहे, त्याकरिता रायगड जिल्ह्यातील आम्ही तीनही आमदार एकत्रित आलो आहोत, असे लिहिले आहे.

आम्ही गुवाहाटी येथे आहोत. आम्ही स्वच्छेन येथे आलेलो आहोत. गेल्या दोन ते अडीच वर्षात जे अनुभवले भोगले आणि खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्य हिंदूत्वाचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही येथे आलो आहोत. याचे कारण असे की आमच्यावर वेळेवेली अन्यायझाले आणि यावर न्याय मिळण्याची एकच आस आहे ते म्हणजे शिंदे साहेब, असे बंडखोर आमदार महेंद्र दळवी म्हणाले.