‘धनुष्यबाण’ मिळवण्यासाठी शिंदेंकडून कायदेशीर लढाई सुरू? मूळ पक्षासाठी प्रयत्न करणार

shiv sena eknath shinde says balasaheb thackeray and anand dighe superpower with us

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेतील जवळपास सर्वच आमदारांना आपल्या गटात सामिल करून घेतलं आहे. त्यामुळे, शिवसेनेचे आता दोन गट झाले असून उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा सामना रंगताना दिसतोय. दरम्यान, शिंदे गटाला मूळ पक्ष म्हणून दर्जा मिळवण्याकरता एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रयत्न सुरू असल्याचं म्हटलं जात आहे. शिवसनेचे धनुष्यबाण मिळवण्यासाठी शिंदे कायेशीर लढाई लढवतील असं राजकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात येतंय. महत्त्वाचं म्हणजे, यासाठी भाजपची टीम मदत करत असल्याचंही सांगण्यात येतंय. (Eknath Shinde will go legally for Main Party formation)

आणखी वाचा

शिवसेनेच्या शिंदे गटात अपक्षांसह ४६ आमदार आहेत. तसेच, अनेक खासदारही त्यांच्या संपर्कात असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे आपला गट हीच खरी शिवसेना असा दावा एकनाथ शिंदे विधानसभा उपाध्यक्षांना पत्र पाठवून करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे विधानसभा उपाध्यक्षांना पत्र लिहिल्यानंतर एकनाथ शिंदे सत्तास्थापनेचा दावा करतील असंही म्हटलं जातंय.

राजकीय विश्लेषक काय म्हणतात?

मूळ पक्षात फूट पाडण्याकरता पक्षातील दोन तृतीअंश आमदार त्या गटाकडे आवश्यक असतात. दुसऱ्या गटाला तेव्हाच पक्षावर हक्क मिळतात जेव्हा त्यांच्याकडे ऑफिस बेरर, पक्षाचे प्रतिनिधी, लोक प्रतिनिधी मिळून दोन तृतीयांश कोटा पूर्ण केलेला असेल. अशा परिस्थितीत दुसऱ्या गटाला पक्षाचं नाव, पक्षाचं चिन्ह तुम्हाला मिळू शकतं.

फूट पडल्यानंतर दुसऱ्या गटाने निवडणूक आयोगाकडे मूळ पक्ष आमचा आहे, असा दावा करावा लागतो. या दाव्यावर आयोग काय निर्णय घेते यावर न्यायालयीन लढाई लढली जाते. अर्थात ही फार प्रदीर्घ प्रक्रिया आहे.

हेही वाचा