घरदेश-विदेशसत्तासंघर्षाच्या निकाल आधीच मुख्यमंत्री राजीनामा देणार का? उपमुख्यमंत्री म्हणाले...

सत्तासंघर्षाच्या निकाल आधीच मुख्यमंत्री राजीनामा देणार का? उपमुख्यमंत्री म्हणाले…

Subscribe

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल उद्या सर्वोच्च न्यायालय देणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरणार की नाही याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

मुंबई | “एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाहीत”, असा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल उद्या सर्वोच्च न्यायालय (supreme court) देणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरणार की नाही याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.हा मुर्खांचा बाजार आहे, एकनाथ शिंदे राजनामा का देतील?, असा सवाल उपमुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाचा राजनामा देतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे?, पत्रकारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “हा मुर्खांचा बाजार आहे, एकनाथ शिंदे राजनामा का देतील.  एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाहीत. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. आगामी निवडणूक ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आम्ही लढू.”, राज्याचे सरकार स्थिर आहे का?, यावर उपमुख्यमंत्री म्हणाले, “राज्याचे सरकार हे एकदम स्थिर आहे.  असे कोणतेही कारण नाही की, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाही.”

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयात उद्या सत्तासंघर्षाचा निकाल लागणार आहे, पत्रकारांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री म्हणाले, “आमची केस मजबूत आहेत. यामुळे योग्य निकाल येईल, अशी अमची अपेक्षा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे गंभीऱ्याने बघितले पाहिजे. निकाल येईलपर्यंत कोणत्याही तर्कविर्तक काढणे योग्य नाही. पण, आम्ही आशावादी आहोत, योग्य निकाल येईल.”

- Advertisement -

हेही वाचा – मोठी बातमी: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा उद्या सर्वोच्च न्यायालयात निकाल

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -