Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी टोल फ्री करण्यासाठी मुख्य सचिवांना सूचना, आषाढी एकादशीच्या नियोजनाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी...

टोल फ्री करण्यासाठी मुख्य सचिवांना सूचना, आषाढी एकादशीच्या नियोजनाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

Subscribe

आषाढी एकादशीची सुरूवात झालेली आहे. लाखो भक्त आणि वारकरी तेथे जाणार आहेत. त्यामुळे येथील आढावा मी घेतला आहे. सर्व पोलीस अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांसोबत, विभागीय आयुक्त पुणे आणि सर्व प्रशासकीय अधिकारी, सचिव, अतिरिक्त सचिव यांसोबत चर्चा करण्यात आली. जे अधिकारी दरवर्षी नियोजन करतात, त्यांच्यासोबत देखील चर्चा केली. जे वारकरी दिंड्या आहेत त्यांच्यावर अधिक लक्ष द्या. ज्या गाड्या आपल्या पंढरपूरला जात आहेत. कोकणात गणपतीला गाड्या जायच्या तेव्हा आपण ज्याप्रकारे स्टीकर देत होतो, तसेच स्टीकर आपण वारकरी सांप्रदायांनी गाडी नंबर आणि नावाची नोंदणी करावी. तसेच ट्रोल फ्री करण्यासाठी मुख्य सचिवांना मी सूचना दिल्या आहेत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

टोल फ्री करण्यासाठी मुख्य सचिवांना सूचना

एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी आषाढी एकादशीच्या नियोजनाबाबत चर्चा झाल्याचे म्हटले आहे.  मागील दोन वर्ष आषाढी वारी झाली नव्हती. त्यामुळे वारकरी आता पंढरपुरला जाणार आहेत. त्यामुळे अगदी औषध, ट्रॅफीकपासून प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांची कुठलीही गैरसोय होऊ नये, यासाठी योग्य ती व्यवस्था करण्यात आली आहे. स्वच्छता, आरोग्य यावर कोणताही प्रकारचा परिणाम होणार नाही आणि पोलिसांचं संख्याबळ देखील तैनात करण्यात आली आहे. निधीची व्यवस्था करण्याची सूचना सुद्धा मुख्य सचिवालयांना देण्यात आली आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

सर्व कुटुंबियांसह पांडुरंगाच्या दर्शनाला जाणार

- Advertisement -

एसटीच्या जवळपास ४ हजार ७०० बसेस सोडण्यात आल्या आहेत. आणखी गाड्या लागल्या तरी सोडण्यात येणार आहेत. यात्रेकरूंना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, त्यामुळे ही वारी मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल. माझ्या सारख्या कार्यकर्त्याला पांडुरंगाची पूजा करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे सर्व कुटुंबियांसह मी पांडुरंगाच्या दर्शनाला जाणार आहे, असं शिंदे म्हणाले.

पोलीस हा समाजाचा मुख्य घटक

पोलीस हा आमच्या समाजाचा मुख्य घटक आहे. सगळ्या धर्माचे जेव्हा सण असतात तेव्हा हा पोलीस रस्त्यावर उतरतो. आपल्या कुटुंबियांपासून तो दूर असतो. त्यामुळे त्याला घरची चिंता असता कामा नये, यासाठी त्यांच्या घरासाठी योग्य ती तयारी आणि नियोजन कसे करण्यात येईल, यावर आम्ही लवकरच निर्णय घेऊ, असं शिंदे म्हणाले.

- Advertisement -

मागील दोन-तीन दिवसांपासून जो मुसळधार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कुठल्याही परिस्थितीत राज्यामध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर मालमत्तेचं नुकसान आणि कुठलीही जिवीतहानी होऊ नये, यासाठी सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत. काही सूचना देखील देण्यात आल्या आहेत, असं शिंदे म्हणाले.


हेही वाचा : मोदी सरकारचा नवा नारा; ‘ना खाने दूँगा और ना पकाने दूँगा, नाना पटोलेंचा हल्लाबोल


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -