घरमहाराष्ट्रमुख्यमंत्री पदासाठी आपल्या नावाची घोषणा होताच एकनाथ शिंदेंचे नवं ट्विट

मुख्यमंत्री पदासाठी आपल्या नावाची घोषणा होताच एकनाथ शिंदेंचे नवं ट्विट

Subscribe

भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली, यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची घोषणा केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपण मंत्रिमंडळाबाहेर राहणार असल्याचे जाहीर केले. आज संध्याकाळी 7.30 वाजता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. मात्र मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी तीन नवे ट्विट केले आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शाह, आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

मुख्यमंत्रीपदी नावाची घोषणा झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे की,  हा वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळसाहेब ठाकरे यांच्या विचारांचा व धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिकवणीचा विजय…! महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी कायम कटीबद्ध…

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, गृहमंत्री अमित शाहजी, भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डाजी, देवेंद्र फडणवीसजी व चंद्रकांतदादा पाटील यांचे मनःपूर्वक आभार… तसेच स्वत:ची परवा न करता,हिदूत्वासाठी व महाराष्ट्राच्या हितासाठी न घाबरता सत्तात्याग करून वेगळी भूमिका मांडण्याची धमक दखावणार्या माझ्या सहकारी आमदारांचे ही आभार, अस ट्विट देखील एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

- Advertisement -

मविआ सरकारमध्ये अडचणी येत होत्या : शिंदे

यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्राच्या विकासासाठी आपण एकत्र आलो आहोत. महाविकास आघाडी सरकारमध्ये काम करताना अडचणी येत होत्या. आम्ही उद्धव ठाकरेंना याबाबत सांगितले. आम्ही आमची बाजू समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आमची भाजपशी स्वाभाविक युती होती. बाळासाहेबांच्या विचाराने आपण पुढे गेलो तेव्हा हिंदुत्वाबाबत सरकारने काही निर्णय शेवटी घेतले.

शिंदे यांनी पंतप्रधानांचे आभार मानले

एकनाथ शिंदे म्हणाले की, मी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांचा आभारी आहे, फडणवीस मुख्यमंत्री होणार नाहीत. मोठा पक्ष असूनही भाजपने मोठे मन दाखवून मला मुख्यमंत्री केले आहे. येत्या काळात महाराष्ट्रात मजबूत सरकार दिसेल, असा दावा शिंदे यांनी केला. केंद्र सरकार ज्या पद्धतीने महाराष्ट्राला मदत करेल, महाराष्ट्राचा विकास अधिक वेगाने होईल. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी हे सरकार काम करेल.


ठाकरेंच्या शेवटच्या कॅबिनेटमधील निर्णय अवैध, पण तरीही सहमत- फडणवीस

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -