घर महाराष्ट्र शिंदेंची शिवसेना आता 'गोव्या'त; आगामी लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने तयारी

शिंदेंची शिवसेना आता ‘गोव्या’त; आगामी लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने तयारी

Subscribe

येत्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने शिंदेंनी तयारी सुरु केली आहे. पक्ष विस्ताराच्यादृष्टीने प्रशासन व सदस्यत्व मोहीम गोव्यात राबवली जाणार आहे. गोव्यातील काही महत्त्वाचे राजकीय नेते शिवसेनेच्या संपर्कात असून ते पक्षात प्रवेश करतील,असे पक्षाचे राष्ट्रीय नेते तथा माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने गोव्यात प्रवेश केला आहे. येत्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने शिंदेंनी तयारी सुरु केली आहे. पक्ष विस्ताराच्यादृष्टीने प्रशासन व सदस्यत्व मोहीम गोव्यात राबवली जाणार आहे. गोव्यातील काही महत्त्वाचे राजकीय नेते शिवसेनेच्या संपर्कात असून ते पक्षात प्रवेश करतील,असे पक्षाचे राष्ट्रीय नेते तथा माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मागच्या तीस वर्षांपासून शिवसेना गोव्यात आहे. मात्र, राजकीय स्तरावर शिवसेनेला अपेक्षित यश आले नाही. मात्र, आता शिवसेना गोव्यात पुन्हा एकदा नव्याने लाॅंच केली जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने ही तयारी असून शिवसेना गोव्यातूनही ही ल़ढवेल, असे अडसूळ यांनी स्पष्ट केले.  (Eknath Shindes Shiv Sena now launch in Goa Preparations for the upcoming Lok Sabha elections )

महाराष्ट्राचा खऱ्या अर्थाने विकास होतोय

आनंदराव अडसूळ म्हणाले की, महाराष्ट्र शिवसेनेत काही महिन्यांपूर्वी बंडखोरी झाली. मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्त्वाखी 40 आमदार व मंत्र्यांनी शिवसेनेतून फुटून वेगळा गट निर्माण केला आहे. सरकारमध्ये असूनही विकासकामे करण्यास येणारी अडचण हे फुटीचे कारण होते. मुख्यमंत्री शिंदे हे दिवस रात्र महाराष्ट्रासाठी झटत आहेत. 24 तासांपैकी 18 ते 20 तास काम करतात. रात्री उशिर झाला तरीदेखील ते आपल्या कार्यकर्त्यांना भेटतात. महाराष्ट्र त्यांच्या नेतृत्त्वाखाली खऱ्या अर्थाने विकास करत आहे, असे अडसूळ यांनी सांगितले.

- Advertisement -

( हेही वाचा: हीच तुमची मानसिकता का? भगवान गडावर पंकजा मुंडे- नामदेव शास्त्रींमध्ये वाद )

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्या दौऱ्यानंतर आता आगामी लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यानुसार ते गोव्यात शिवसेना लाॅंच करण्याच्या प्रयत्नात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौराही मोठा चर्चेचा विषय बनला होता. या दौऱ्याच्या माध्यमातून त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शनही केलं. तसंच, प्रभू श्रीरामाला मानणारेच सत्तेत राहणार असल्याचं शिंदे म्हणाले होते. परंतु, त्यांच्या या दौऱ्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. विरोधकांनी शिंदे यांच्यावर अयोध्या दौऱ्यावरुन टीका केली होती. तसेच, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यात अवकाळीने नुकसान झालं असताना, मुख्यमंत्री मात्र अयोध्या दौऱ्यावर असल्याचं म्हटलं होतं.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -