घरताज्या घडामोडीCoronavirus : राज्यातील 'या' महत्त्वाच्या यात्रा रद्द

Coronavirus : राज्यातील ‘या’ महत्त्वाच्या यात्रा रद्द

Subscribe

करोनाचा संसर्ग होऊ नये, यापार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या देवींच्या यात्रा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने आणि ग्रामपंचायतीने घेतला आहे.

चीनच्या वुहान प्रांतातून सार्‍या जगभरात पसरलेल्या करोनाने आता राज्यात देखील हात पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. राज्यात आतापर्यंत १७ करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या करोनाचा संसर्ग होऊ नये, यापार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या देवींच्या यात्रा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने आणि ग्रामपंचायतीने घेतला आहे. यामध्ये प्रसिद्ध देवस्थान असलेल्या कार्ला गडावरील श्री एकविरा देवीची चैत्री यात्रा रद्द करण्याचा निर्णय प्रशासकीय समितीने घेतला आहे. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेजुरीची सोमवती यात्रा देखील रद्द करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जेजुरी ग्रामस्थांनी जेजुरीची २३ मार्चला होणारी यात्रा देखील रद्द करण्याचा निर्णय जेजुरी ग्रामस्थ मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यात्रेनिमित्त होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

यात्रा न भरवण्याचा ठराव मंजूर

- Advertisement -

वडगाव मावळ येथे प्रशासकीय समितीचे अध्यक्ष आणि वडगाव मावळ येथील दिवाणी न्यायालयाचे न्यायाधिश, सचिव आणि मावळचे तहसीलदार आणि सदस्य सह धर्मदाय आयुक्त यांनी भाविक आणि वेहेरगाव ग्रामस्त यांच्याशी बैठक घेत हा निर्णय जाहीर केला आहे. तत्पूर्वी वेहेरगाव ग्रामपंचायतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा न भरवण्याचा ठराव मंजूर केला होता.

चैत्री यात्रा रद्द

- Advertisement -

एकविरा देवस्थान हे पुणे जिल्ह्यातील वेहेरगाव असून येथे चैत्री यात्रेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक येत असतात. त्यामुळे होणाऱ्या गर्दीतून कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा सार्वधिक धोका असल्याने भाविकांनी गर्दी करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

सोमवती यात्रा रद्द

जेजुरीची सोमवती यात्रा देखील रद्द करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जेजुरी ग्रामस्थांनी जेजुरीची २३ मार्चला होणारी यात्रा देखील रद्द करण्याचा निर्णय जेजुरी ग्रामस्थ मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

इजतेमा बाबाची यात्रा रद्द

औरंगाबाद येथील पैठण रोड चितेगावमध्ये होणारी इजतेमा आणि मांगीर बाबाची यात्रा रद्द करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. २७, २८ आणि २९ तारखेला ही यात्रा होणार आहे. या इजतेमासाठी आखाती देशातील लोक येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे यात्रा रद्द करणार असल्याची माहिती औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

मांगीर बाबाची यात्रा रद्द

९ एप्रिल पासून मांगीर बाबा यात्रा होणार होती. मात्र ही देखील यात्रा रद्द करणार असल्याचे सांगितले आहे. लवकरच दोन्ही संयोजकांशी बोलणार असल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी सांगितले आहे.

तुकाराम बीज सोहळ्यावर करोनाचे सावट

पुणे जिल्ह्यातील देहूमध्ये होणाऱ्या तुकाराम बीज सोहळ्यावर करोनाचे सावट पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या भीतीने वारकऱ्यांनी तुकाराम बीज सोहळ्याकडे पाठ फिरवल्याने वारकऱ्यांच्या संख्येत २५ टक्क्यांनी घट झाल्याची माहिती आहे.


हेही वाचा – पेट्रोल, डिझेलच्या उत्पादन शुल्कात वाढ, आजपासून लिटरमागे ३ रूपये वाढले


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -