HomeElection 2023Election 2023: अमित शहांची भविष्यवाणी खरी ठरली; अजित पवार म्हणाले, निकाल काय...

Election 2023: अमित शहांची भविष्यवाणी खरी ठरली; अजित पवार म्हणाले, निकाल काय येणार हे माहीत होतं

Subscribe

मुंबई: देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवर आहे. तर तेलंगणामध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. यावरून भाजपाची खासदारांची रणनीती प्रभावी ठरताना दिसत आहे. आतापर्यंत समोर आलेल्या ट्रेंडवरून महाराष्ट्रातील नेता प्रतिक्रिया देत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी भाजपाचं अभिनंदन केलं आहे. तसंच हा निकाल काय लागणार हे आधीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं होतं. त्यांनी सांगितल्याप्रमाणेच निकाल लागल्याचं अजित पवार म्हणाले.  (Election 2023 Amit Shah s prediction came true Ajit Pawar said he knew what the result would be)

देशाला मोदींशिवाय पर्याय नाही

अजित पवार म्हणाले की, मोदींमुळे देशाची प्रतिमा उंचावली आहे. निकाल चांगला येणार हे मी आधीच बोललो होतो. मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती होत आहे. इंडिया, इंडियावाले आता ईव्हीएमबाबत बोलतील. ईव्हीएम घोटाळा हा रडीचा डाव आहे. मोदींसमोर कोण उमेदवार असणार आहे हे सुद्धा विरोधकांचं ठरलं नाही. जनतेनं जो कौल दिला आहे तो मान्य केला पाहिजे. ईव्हीएम घोटाळा एकाला शक्य नाही, असं अजित पवार म्हणाले.

आता विरोधक रडीचा डाव खेळतील

अजित पवार म्हणाले की, आता INDIA वाले म्हणतील त्या EVM मध्ये घोटाळा केला आहे. ते असं बोलणारच त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. परंतु जर मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये EVM चा घोटाळा झाला आहे तर मग तेलंगणात काय झालं, असा सवाल त्यांनी यावेळी केला. मी विरोधात होतो तेव्हाही म्हणालो आहे की, EVM मध्ये घोटाळा वगैरे काही नसतं, हा रडीचा डाव विरोधक खेळत असतात.

शरद पवारांवर साधला निशाणा

अजित पवारांनी यावेळी शरद पवारांवर देखील निशाणा साधला आहे. अजित पवार म्हणाले, काहींनी आशीर्वाद द्यायला पाहिजे. परंतु ते थांबायला तयार नाहीत. त्यामुळे आम्ही सर्वांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातही लोकसभा निवडणुकीत आम्ही यश संपादन करू. 48 पैकी 45 जागा आम्ही निवडून आणणार असल्याचं अजित पवार म्हणाले.

(हेही वाचा: Post Results Effect : मतमोजणी सुरू असतानाच भाजपा अन् काँग्रेसकडून ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’ सुरू )