घरमहाराष्ट्रElection 2024: बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार सामना रंगणार; महायुतीचा उमेदवार...

Election 2024: बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार सामना रंगणार; महायुतीचा उमेदवार कोण?

Subscribe

पवारांच्या बालेकिल्ल्यात यावेळी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार सामना रंगणार असल्याचं बोललं जात आहे. बारामतीत महायुतीकडून कोणत्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातही जागावाटपाचे फॉर्मुले ठरवले जात आहेत. परंतु या सगळ्यात सर्वाधिक चर्चा आहे ती बारामती लोकसभा मतदारसंघाकडे. (Election 2024 Supriya Sule and Sunetra Pawar will fight in Baramati Who is the candidate of Mahayuti)

बारामती हा पवार कुटुंबियांचा गड मानला जातो. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे तीन टर्मपासून खासदार आहेत. यापूर्वी शरद पवार या मतदारासंघाचे खासदार होते. तर अजित पवारही या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत. अशा या पवारांच्या बालेकिल्ल्यात यावेळी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार सामना रंगणार असल्याचं बोललं जात आहे. बारामतीत महायुतीकडून कोणत्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

- Advertisement -

सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा?

अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवारी मिळू शकते अशी शक्यता आहे. सुनेत्रा पवार या सक्रिय राजकारणात नाहीत. परंतु त्यांच्याकडे राजकारणाचा वारसा आहे. तसंच त्या हायटेक टेक्सटाईल पार्क बारामती या संस्थेच्या अध्यक्षा आहेत. तर एन्व्हायरमेटंल फोरम ऑफ इंडिया या स्वयंसेवी संस्थेच्याही अध्यक्षा आहेत. या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. तसंच, सुप्रिया सुळेंविरोधात कोणाला उभं करायचं तर ती व्यक्ती पवार घराण्यातीलच असावी, म्हणूनदेखील सुनेत्रा पवार यांचं नाव चर्चेत आलं आहे.

बारामती लोकसभेचा इतिहास काय?

बारामतीतून 1957 साली काँग्रेसचे केशवराव जेधे हे पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून गेले. तेव्हापासून 1977 चा अपवाद वगळता कायमच ही जागा काँग्रेस आघाडीकडे राहिली आहे. गेले तीन टर्म खासदार सुप्रिया सुळे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. पण सुप्रिया सुळे यांना यंदा पराभूत करायचाच असा चंग भाजपाने बांधला आहे.

- Advertisement -

अशी आहे बारामती मतदारसंघाची रचना

बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभांचा समावेश आहे. बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर -हवेली, भोर, आणि खडकवासला या सहा मतदारसंघाचा त्यात समावेश होतो. यामध्ये राष्ट्रवादीचे दोन, अजित पवार आणि दत्तात्रय भरणे, काँग्रेसचे दोन, संजय जगताप आणि संग्राम थोपटे आणि भाजपचे दोन, राहुल कुल आणि भीमराव तापकीर असं आमदार आहेत.

(हेही वाचा: Uddhav Thackeray : अर्थमंत्री सीतारामन यांचा ‘शेवटचा’ अर्थसंकल्प, उद्धव ठाकरेंचा टोला )

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -