घरमहाराष्ट्रदिव्यांग मतदारांना विशेष सोयीसुविधा उपलब्ध करा - निवडणूक निरीक्षक

दिव्यांग मतदारांना विशेष सोयीसुविधा उपलब्ध करा – निवडणूक निरीक्षक

Subscribe

दिव्यांगांकरिता जास्तीत जास्त मतदार जनजागृती करा, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत नव्याने सर्वेक्षण करून दिव्यांग मतदार यादी सुधारीत करण्याचे निर्देश

२३ – भिवंडी लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग, मुकबधीर मतदारांना सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी कोकण महसूल उपायुक्त तथा सहाय्यक प्रवेश योग्यता निरीक्षक (AAO) सिद्धराम सालीमठ यांनी नुकतीच निवडणूक कार्यालयात आढावा बैठक घेऊन दिव्यांग मतदारांना विशेष सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. या लोकसभा मतदार संघातील १३४- भिवंडी ग्रामीण,१३६- भिवंडी पश्चिम,१३७ – भिवंडी पूर्व या तीन विधानसभा मतदारसंघांचा आढावा कोकण महसूल उपायुक्त तथा सहाय्यक प्रवेश योग्यता निरीक्षक (AAO)श्री सिद्धराम सालीमठ यांनी घेतला.

दिव्यांग मतदारांचा आढावा

सिद्धनाथ सालीमठ हे तीन दिवसांच्या ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ते विधानसभा निहाय दिव्यांग मतदारांना पुरवण्यात येणाऱ्या सोयीसुविधा, मतदान केंद्रावर उपल्बध केल्या जाणाऱ्या सोयीसुविधांचा आढावा घेत आहेत.याबाबत सालीमठ यांनी २३ – भिवंडी लोकसभा निवडणूक कार्यालय येथे विशेष आढावा बैठक घेतली. यावेळी भिवंडी लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.मोहन नळदकर , सदानंद जाधव, जलसिंग वळवी आदी उपस्थित होते. या तीनही विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग मतदारांचा आढावा घेण्यात आला.

- Advertisement -

दिव्यांग मतदारांच्या सोयीसाठी व्यवस्था

दिव्यांग मतदारांच्या सोयीसाठी मतदान केंद्रांवर आवश्यक सोयीसुविधा पुरवणे, मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची सोय, पाळणाघर, मतदान केंद्रावर मंडपाद्वारे सावलीची सोय, शौचालय, पाण्याची सुविधा तसेच सर्व दिव्यांग मतदारांशी संपर्क साधून त्यांच्या नातेवाईकांचे संपर्क नंबर घेऊन त्यांच्याशी संपर्क करून ते मतदानाला कधी येणार आहेत. याची माहिती करून घ्यावी व त्यानूसार त्यांना वाहन उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी.

दिव्यांग मतदारांना विशेष सोयीसुविधा

प्रादेशिक वाहन विभागामार्फत १३४- भिवंडी ग्रामीण करीता २५ रिक्षा तर १३६ व १३७ मधील शहरी भागाकरीता प्रत्येकी दहा रिक्षा आरक्षित करण्यात आल्या आहेत. दिव्यांगांच्या मदतीकरता रिक्षाची सोय करण्यात आलेली आहे. तसेच यावेळी अशासकीय सामाजिक संघटना, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, आशा वर्कर महिला संघटना आदींची मदत घेण्यात येणार आहे.  मतदान कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणात अपंग कर्मचारी, दिव्यांग कर्मचाऱ्यांची माहिती घेऊन त्यांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची माहिती द्या, असे आवाहन देखील यावेळी सहाय्यक प्रवेश योग्यता निरीक्षक सिद्धाराम सालीमठ यांनी केली आहे. दिव्यांगांकरिता जास्तीत जास्त मतदार जनजागृती करा, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत नव्याने सर्वेक्षण करून दिव्यांग मतदार यादी सुधारीत करा, असे निर्देश कोकण महसूल उपायुक्त सिद्धाराम सालीमठ यांनी दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -